एसआयईएस महाविद्यालयाच्या प्रागंणात शक्ती प्रदर्शनाचे आयोजन – eNavakal
कॉलेज फेस्टिव्हल मुंबई

एसआयईएस महाविद्यालयाच्या प्रागंणात शक्ती प्रदर्शनाचे आयोजन

मुंबई – एसआयईएस या महाविद्यालयात आज वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर एनएसएस विभागाच्या विद्यार्थ्यानी या महाविद्यालयाच्या प्रागंणात शक्ती प्रदर्शनाचे सादरीकरण केले. सकाळी १० वाजेपासून या कार्यक्रमाला सुरवात झाली. यादरम्यान एकूण ९० एनएसएसच्या विद्यार्थ्यानी यामध्ये सहभाग घेतला होता. तसेच या विद्यार्थ्यानी या कार्यक्रमात कॉन्टीजेन्ट ड्रिल, कॉन्टीजेन्ट ड्रिल फॉरमेशन, हुमन पिरॅमिड फॉरमेशन, ऍडव्हान्स रायफल ड्रिल, लेझीम, सेल्फ डिफेन्स, वॉर डेमॉन्ट्रेशन इत्यादी प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये ९० विद्यार्थ्यामध्ये एकूण ४० मुली आणि ५० मुलांचा समावेश होता. तसेच या कार्यक्रम दरम्यान व्यासपीठावर एसआयईएस महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उमा शंकर, एनएसएस विभागाच्या प्रमुख आरती मुळे आणि नंबर १ महाराष्ट्राच्या एनएसएस बटालियन ऑफ द इंडिया आर्मीचे दोन अधिकारी देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी या अधिकाऱयांनी विद्यार्थ्याचे कौतुक केले. तसेच ‘विद्यार्थ्याना चांगलेच मार्गदर्शन मिळावे आणि प्रात्यक्षिकामुळे त्यांचा सराव व्हावा असे आम्हाला वाटते.’ असे या महाविद्यालयाच्या प्राचार्यानी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

देवेंद्र फडणवीसच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार – अमित शहा

मुंबई – भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जनतेशी संवाद साधताना त्यांनी भाजपच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावर शिक्कामोर्तब केला. देवेंद्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘तुमच्याकडे काही काम नसेल तर मीम्स बनवा’, सोनाक्षीचे ट्रोलर्सना उत्तर

मुंबई – कौन बनेगा करोडपती -11 मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या रामायण या पौराणिक कथेतील प्रश्‍नावरील उत्तराने सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल व्हावे लागत आहे. सोनाक्षी...
Read More
post-image
लेख

व्हिएतनाम युद्धाविरोधात उभी राहिलेली अमेरिकेची आघाडीची अभिनेत्री जेन फोंडा

साठ-सत्तरच्या दशकातील अमेरिकेची आघाडीची, सुप्रसिद्ध, नामवंत अभिनेत्री जेन फोंडा एका वेगळ्याच कारणासाठी सगळ्या जगभर ओळखली जाते आणि अमेरिकेतील लाखो लोकांकडून तिच्यावर आजही प्रखर टीका...
Read More
post-image
देश

एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिलेला गुगलची मानवंदना

नवी दिल्ली – जगप्रसिद्ध गिर्यारोहक आणि माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या महिला जुन्को ताबेई यांचा आज 80 वा स्मृतिदिन आहे. यानिमित्ताने गुगलने खास डूडल...
Read More