एल्गार परिषदेला जे नव्हते त्यांच्यावरही गुन्हे दाखल- शरद पवार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई राजकीय

एल्गार परिषदेला जे नव्हते त्यांच्यावरही गुन्हे दाखल- शरद पवार

मुंबई – भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदप्रकरणी आज शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन भाष्य केलं आहे. एल्गार परिषदेला जे नव्हते त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. परिषदेला जे हजर नव्हते त्यांना तुरुंगात डांबण्यात आलंय. त्यामुळे निर्दोष लोकांना सोडून द्या, असं शरद पवार म्हणाले.
भीमा कोरेगावला दरवर्षी लोक जमतात आणि विजय स्तंभाला अभिवादन करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तिथे जाऊन आल्यानंतर तिथे जाणाऱ्यांची संख्या वाढली. संभाजी भिडे यांनी त्या ठिकाणी एक वेगळे वातावरण निर्माण केलं. त्यात नक्की काय झालं ते चौकशीत बाहेर येईल, असं शरद पवार म्हणाले. एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमाशी काहीही संबंध नाही. एल्गार परिषद त्याच्या काही दिवस आधी झाली होती. शंभरपेक्षा जास्त संघटना परिषदेत सहभागी झाल्या होत्या. अध्यक्षपद नि. न्यायमूर्ती पी बी सावंत करणार होते. परंतु ते येऊ शकले नाहीत. एल्गार परिषदेशी संबंध नसलेल्या, हजर नसलेल्या लोकांवर खटले भरले गेले. त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं. सुधीर ढवळेंनी नामदेव ढसाळ यांची एक कविता वाचून दाखवली होती. ‘रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आय-बहीण आजही विटंबली जाते’ ही कविता वाचल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

एल्गार परिषदप्रकरणी पोलिसांचीही चौकशी झाली पाहिजे. हे संपूर्ण प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं ते योग्य नाही. राज्य सरकारलाही समांतर तपास करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेक्शन १० चा वापर करून राज्य सरकारानंही चौकशी करावी. विशेष चौकशी करण्याची न्यायालयाप्रमाणे आमचीही मागणी असल्याची शरद पवार यांनी सांगितले.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: साडेपाच लाख बेघर मजुरांना अन्नवाटप- मुख्यमंत्री

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यामध्ये एकूण ४६५३ मदत केंद्रे स्थापन केली आहेत. यामध्ये ४,५४,१४२ स्थलांतरित मजूर आणि कामगारांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

Corona: राज्यात कोरोनाचे ८६८ रुग्ण, मुंबई डेंजर झोनमध्येच!

मुंबई – देशभरातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. गेल्या २४ तासांत १२० नवे रुग्ण सापडले असून आता कोरोनाबाधितांची...
Read More
post-image
देश

जात, धर्म विसरून साऱ्यांनी एकत्र येऊया- राहुल गांधी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर सगळ्या देशाने धर्म, जात, संप्रदाय, गरीब-श्रीमंत हा सगळा भेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे असं...
Read More
post-image
महाराष्ट्र

आपत्कालीन परिस्थीतीसाठी केंद्राकडे मागितले पीपीई किट्स आणि मास्क- टोपे

मुंबई – कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी राज्यामध्ये पुरेशा प्रमाणात साधनसामग्री उपलब्ध आहे. मात्र, आपत्कालीन स्थिती ओढवल्यास खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र शासनाकडे सव्वा तीन लाख पीपीई...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ देऊ नका, राज्यपालांचे आदेश

मुंबई – कोरोनाविरुद्धच्या लढ्यामध्ये राज्याचे चांगले काम सुरू आहे. मात्र, मरकजमध्ये सहभागी लोकांमुळे वाढत असलेल्या कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर विशेष जागरुकता ठेवावी. कोठेही कायदा व...
Read More