एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पुलाचे बांधकाम लष्कराकडून सुरू – eNavakal
मुंबई वाहतूक

एलफिन्स्टन स्टेशनवर नव्या पुलाचे बांधकाम लष्कराकडून सुरू

मुंबई –एलफिन्स्टन आणि परळ रेल्वे स्थानकाला जोडणार्‍या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर नव्या पुलाचे काम आजपासून सुरू झाले आहे. या नव्या पुलाचे बांधकाम लष्कराकडून केले जाणार आहे. 31 जानेवारी 2018 पर्यंत या नव्या पुलाचे काम पूर्ण करण्याचा विडा लष्कराने उचलला आहे. पुलाच्या बांधकामाची अंमलबजावणी लष्कराच्या हाती असल्याने तातडीने या कामाला सुरुवात झाली असून प्रवाशांना पुढच्या काही दिवसांत एक मोठा दिलासा मिळेल, याबाबत खात्री बाळगण्यास हरकत नाही. एलफिन्स्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सरकार आणि रेल्वे प्रशासनाला मोठ्या संतापाचा सामना सहन करावा लागला होता. तर मनसेकडूनही यासाठी आंदोलन करण्यात आले होते. मात्र आता या पुलाचे बांधकाम सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या स्टेशनवरील गर्दीचा प्रश्न यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासन खळबळून जागे झाले असून विविध कामांना हिरवा कंदील दिला आहे. पादचारी पुलावर दिशादर्शक फलक लावण्यात येणार आहे. स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच महिलांच्या डब्यात टॉकबॅक यंत्रणा 15 महिन्यांत सुरू करण्यात येणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More