एलईडीव्दारे पर्ससीन मासेमारी बंद करा, शुक्रवारी मुंबई बंदरावर हल्लाबोल – eNavakal
News आंदोलन मुंबई

एलईडीव्दारे पर्ससीन मासेमारी बंद करा, शुक्रवारी मुंबई बंदरावर हल्लाबोल

मुंबई – एलईडी लाईटव्दारे पर्ससीन नेटने मासेमारी करणार्‍यांवर केंद्र शासनाच्या कृषीमंत्रालयाने 10 नोव्हेंबर 2017 रोजी बंदीचे आदेश दिले असून महाराष्ट्रात मासेमारी खुलेआम सुरु आहे. मत्स्य व्यवसाय खात्याच्या अधिकार्‍यांना वारंवार तक्रारी करुन देखील कारवाई होत नाही. मत्स्यव्यवसाय खात्याच्या या हलगर्जीपणामुळे जाहीर निषेध करुन येत्या शुक्रवारी महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीतर्फे ससून डॉक या मुंबई बंदरावर सकाळी 10 वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे.
एलईडी लाईटव्दारे पर्ससीन नेटने मासेमारी करणार्‍यांवर केंद्र शासनाच्या कृषीमंत्रालयाने 10 नोव्हेंबर 2017 रोजी बंदीचे आदेश दिल्यानंतर 0 ते 12 सागरी मैल व त्याच्यापुढे विशेष आर्थिक झोन (ईईझेड) क्षेत्रामध्ये कार्यवाही करुन एलईडी लाईट ईईझेड क्षेत्रामध्ये भारतीय तटरक्षक दलाची मदत घेवून त्वरीत कार्यवाही करण्याबाबत मत्स्यव्यवसाय विभागास कळविले असूनही महाराष्ट्रात वरील पद्धतीने खुलेआम मासेमारी सुरु आहे. मत्स्यव्यवसाय खात्याच्या अधिकार्‍यांना वारंवार तक्रारी करुन देखील त्यांच्यावर कारवाई न करता उलटपक्षी 5 जानेवारी 2018 रोजी परिपत्रक काढुन मच्छिमार सहकारी संस्थांवर कारवाईचा बडगा उचलल्याचे कळविले आहे. याबाबत संताप महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने व्यक्त केला असून अशाच प्रकारे मासेमारी सुरु राहिली तर मोठ्या प्रमाणावर मत्स्यसाठे नष्ट होतील आणि समुद्रात मासळी मिळणार नाही. त्यामुळे मच्छिमारांच्या रोजी – रोटीचा प्रश्न ऐरणीवर येवून उपासमारीची पाळी येईल अशी भीती महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीने व्यक्त केली आहे. ह्यासंदर्भात 28 जानेवारी 2018 रोजी दापोलीतील हर्णे आणि 29 जानेवारी 2018 रोजी कुलाबा येथील कफपरेड येथे पार पडलेल्या जाहीर सभेत मोठा असंतोष निर्माण झाला असून मत्स्यव्यवसाय खात्यच्या हलगर्जीपणाच्या निषेधार्थ मुंबई बंदरावर हल्लाबोल आंदोलन महाराष्ट्र मच्छिमार कृति समितीवतीने आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनास या समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, चिटणीस मोरेश्वर वैती, उल्हास वाटकरे, सरचिटणीस किरण कोळी, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, उपाध्यक्ष ज. स. तांबे, मोरेश्वर पाटील, अशोक नाईक, फिलीप गस्तान, अमजाद बोरकर, दिलीप घारे, खजिनदार रमेश मेहेरे, महिला संघटक जयकुमार भाय, ठा.पा. जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मेहेरे, मुंबई जिल्हा उपाध्यक्ष परशुराम मेहेरे, म.सं.ठाणे पा.चे ज्योती मेहेर, म.सं.ठाणे, मुंबईचे उज्वला पाटील, म. रा. म. स.सं.चे रामदास संधे, ठाणे जि. म.म.स.सं.चे जयकुमार भाय आणि हर्णे बंदर संघर्ष समितीचे अध्यक्ष पी. एन. चौगुले, ससून डॉक खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे आणि कुलाबाम. सर्वो. सह. सो. कफपरेडचे जयेश भोईर, नॅशनल फिश. वर्कर्स फोरमचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा समावेश असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More