एमबीएच्या पहिल्या वर्षाची प्रश्नपत्रिका मोबाईलवर वायरल  – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र शिक्षण

एमबीएच्या पहिल्या वर्षाची प्रश्नपत्रिका मोबाईलवर वायरल 

औरंगाबाद : औरंगाबादमधील सिडको येथील  वसंतराव नाईक महाविद्यालयाचा एमबीएमच्या पहिल्या वर्षाची अकौटिंग फॉर मॅनेजर या विषयाची प्रश्नपत्रिका फुटली आहे. पेपर सुरु झाल्यानंतर काही मिनिटातच या पेपरचा फोटो एका वॉट्सअप ग्रुपवर आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षा २६ डिसेंबरप्ससुन सुरु झाल्या आहेत. आज एमबीएच्या पहिल्या वर्षाचा अकौटिंग फॉर मॅनेजर हा पेपर सुरु होता. मात्र या पेपरचा फोटो काही मिनिटातच त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर आला आणि कॉलेज आवारातच एका झाडाखाली बसून दोन विद्यार्थी उत्तरे लिहू लागले. हा प्रकार कॉलेजच्या तीन शिपायांच्या लक्षात येताच त्यांनी त्या विद्यार्थ्यांना पकडून प्राचार्यांसमोर हजार केले. तसेच परीक्षा देणाऱ्या आणि फोटो वायरल करणाऱ्या विद्यार्थ्याला देखील पकडण्यात आले.

या प्रकारानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. विद्यापीठाने आजचा पेपर रद्द केला असून पोलीस तक्रार देण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

ठाणे विभागात वर्षभरात शिवशाहीचे 26 अपघात

ठाणे- प्रवाशांना वाजवी दरात वातानुकुलित आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देण्यासाठी एसटी प्रशासनाने शिवशाही बस आणल्या तरी एसटीच्या ठाणे विभागातील शिवशाही बसचे वर्षभरात 26 अपघात...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोलापुरात एमआयएमचा मूकमोर्चा आणि धरणे आंदोलन

सोलापूर – गोपालसिंह समिती, सल्पर समिती, रंगनाथ मिश्रा आयोगाने मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या शिफारसी केल्या होत्या. मात्र त्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नाही. या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या लेख

(वृत्तविहार) नव्या गव्हर्नरांचा कस लागणार

रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर म्हणून शक्तीकांता दास यांची तातडीने निवड केली गेली. कारण पुढच्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेची महत्वाची बैठक होणार आहे त्यापूर्वी रिझर्व्ह बँकेचा...
Read More
post-image
महाराष्ट्र

पुण्यात आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून सुरू होणार

पुणे- ‘आशय फिल्म क्लब’च्या वतीने आयोजित केलेल्या नववा आशियाई चित्रपट महोत्सव 24 डिसेंबरपासून पुण्यात सुरू होणार आहे. 15 आशियाई देशांमधील 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा...
Read More