एमआयडीसीच्या अग्निशमन दलात ‘एनओसी’साठी बड्या अधिकार्‍यांच्या संशयास्पद वारंवार बदल्या – eNavakal
News मुंबई

एमआयडीसीच्या अग्निशमन दलात ‘एनओसी’साठी बड्या अधिकार्‍यांच्या संशयास्पद वारंवार बदल्या

मुंबई – एमआयडीसी अग्निशमन विभागातील गैरकारभार दिवसेंदिवस वाढत आहे. अग्निशमन विभागातील अधिकारी यांची अग्निशमन नाहरकत प्रमाणपत्र (FIRE NOC) बाबत विशेष नियोजन करून त्यानुसार बदल्या करण्यात येतात. अधिकार्‍यांच्या वारंवार होणार्‍या बदल्या हे नाहरकत प्रमाणपत्रमधील होणार्‍या गैरकारभाराचा भाग आहे. अग्निशमन कर्मचारी वारंवार बदलीकरिता विनंती करीत आहेत. परंतु कर्मचार्‍यांच्या बदलीच्या अर्जाची दखल घेतली जात नाही. अधिकारी वर्गाची मात्र पद्धतशीरपणे मर्जीनुसार पाहिजे तेव्हा FIRE NOC मध्ये बाधा येऊ नये यासाठी बदली करण्यात येते.
मे 2017 मध्ये एकूण 18 अधिकार्‍यांची बदली प्रक्रिया पार पडली. त्यानंतर दोनच महिन्यांनी ऑगस्टमध्ये पुन्हा बदली केली. सप्टेंबर 2017 मध्ये परत 6 अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. स्थानिक उद्योगांना नाहरकत प्रमाणपत्र देताना होणारा गैरव्यवहार हे या बदल्यांमागचे कारण आहे. आपल्या मर्जीतील अधिकार्‍यांना त्यांच्या सोयीनुसार बदली दिली जाते. त्या अधिकार्‍यांकडून आपल्या सोयीनुसार काम करून घेतले जाते. यामध्ये अग्निशमन एमआयडीसीतील वरपासून ते खालपर्यंत सर्वच अधिकारी गुंतलेले आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे. स्थानिक अधिकार्‍यांच्यामार्फत सर्व काम पाहिले जाते. त्यामुळे बदलीसाठी पात्र नसतानादेखील फायर एनओसीसाठी अधिकार्‍यांची बदली केली जाते. परंतु त्याच विभागातील कर्मचार्‍यांच्या अडचणींकडे डोळेझाक केली जात असल्याने कर्मचार्‍यांची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
स्थानिक पातळीवरील अधिकारी ना – हरकत प्रमाणपत्राबाबत कसे काम करत आहेत, यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी अंधेरीतील मुख्यालय येथे बेकायदेशीररीत्या बर्‍याच वर्षांपासून काही कर्मचारी अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. यांच्यामार्फतच पसंतीच्या ठिक़ाणी बदलीचा गैरकारभार नियंत्रित केला जातो. काही कर्मचारी अधिकारी यांची एमआयडीसीच्या अग्निशमन केंद्रात अधिकृत नियुक्ती केली असताना ते अधिकारी व कर्मचारी ना – हरकत प्रमाणपत्राच्या कामाकरिता दिवसभर मुख्यालयात असतात. हे अधिकारी कर्मचार्‍यांच्या बदली बाबतीत कमालीचे उदासीन आहेत. अधिकारी वर्गाची बदली पाहिजे तेथे होऊ शकते तर नियमानुसार कर्मचार्‍यांची बदली का होऊ शकत नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या बदल्यांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

सोन्यानंतर आता ‘हिरेजडित कोरोना मास्क’ची क्रेझ

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सर्वजण सध्या मास्क घालूनच पाहायला मिळतात. मात्र ऐकावं ते नवल म्हणतात ना,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राजस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी गोविंदसिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी राजस्थानच्या काँग्रेस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

उपमुख्यमंत्रीपदावरुन हटवल्यानंतर सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया…

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमधून बंडखोरी करत दिल्लीत आलेल्या सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्रीपदावरून हटवले

नवी दिल्ली – राजस्थान सरकारमध्ये बंडाचा झेंडा फडकवणारे सचिन पायलट यांची अखेर काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. तसेच त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर...
Read More
post-image
देश शिक्षण

सीबीएसई दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई – कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशात जवळपास मागील चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन काळात सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. अशात बोर्डाचे निकाल कधी...
Read More