एमआयएम नेत्यावर आरोप करणाऱ्या महिलेची हत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

एमआयएम नेत्यावर आरोप करणाऱ्या महिलेची हत्या

सोलापूर – एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्या विरोधात विनयभंगाची तक्रार देणाऱ्या रेश्मा पडनेकुर या महिलेची हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह सोलापूरच्या विजयपूर परिसरात सापडला असून त्यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रेश्मा यांनी तौफिक शेख यांच्या विरोधात तक्रार दिली होती, त्यामुळे त्यांच्या हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. दरम्यान, रेश्मा यांनी तक्रार दिल्यापासून त्या बेपत्ता होत्या. त्यांच्या हत्येप्रकरणी तौफीक शेख यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कॉंग्रेसचा गोंधळ समजू शकतो पण शरद पवार तुम्ही? मोदींचा हल्लाबोल

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More