एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरू करण्याचा निर्णय

नवी मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच याचं वाढतं संक्रमण टाळण्यासाठी सर्वत्र काही महत्त्वाची पावलं
उचलण्यात आली. त्यानुसार वाशी येथील प्रचंड गर्दी होणारे एपीएमसी मार्केटही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र संपूर्ण देश लॉकडाऊन होण्याचा निर्णय घेण्यात आला असतानाही वाशी येथील एपीएमसी मार्केट शनिवारपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टप्प्याटप्पाने हे मार्केट सुरु होणार आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतील या गोष्टींबाबत नागरिकांना दिलासा मिळणार आहे. परराज्यातून येणारं सर्व सामान, उत्पादनं सुरक्षित येण्यासाठी पोलीसांचं सहकार्य घेतलं जाणार आहे. मार्केटमध्येही कोरोना फोफावणार नाही, यासाठीदेखील काही महत्त्वाची पावलं उचलण्यात येणार आहेत. ज्याअंतर्गत बाजार समितीकडून सॅनिटायझर, टेंम्प्रेचर मशीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिवाय किराणा मालाच्या दुकानात भाजीपाला, अन्नधान्य पोहोचवण्यात येणार आहे.

दरम्यान, मार्केट सुरु होणार असंल तरीही येथे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यावरही भर देण्यात येणार आहे. ज्या कारणी मार्केट हे टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त मालवाहतूक करणाच्या गाड्यांवर बाजार समितीचे स्टीकर्स लावण्यात येणार आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता कोकण आयुक्तांच्या निरिक्षणाअंतर्गत वॉर रूम तयार करण्याचं कामही सुरू आहे. एकंदरच जीवनावश्यक गोष्टींचा तुटवडा जाणवू नये सोबतच कोरोनाचा प्रादुर्भावही वाढू नये यासाठीच उचलण्यात आलेलं हे एक मोठं पाऊल आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
ट्रेंडिंग

क्वारंटाईनमध्ये काय खावं आणि काय टाळावं? ‘WHO’ ने दिल्या ‘या’ सूचना! 

लॉकडाउनच्या काळात प्रत्येकजण घरी राहून आपापल्या आरोग्याची काळजी घेत आहेत. सध्या कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. पोषक आहार, व्यायाम आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

इस्राईलचे आरोग्य मंत्री व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण

जेरुसलेम – कोरोनाची लागण झालेल्या बड्या लोकांच्या यादीत आता इस्राईलचे आरोग्य मंत्री यांचं देखील नाव सामील झालं आहे. इस्राईलचे आरोग्यमंत्री याकोव्ह लिट्झमॅन आणि त्यांच्या...
Read More
post-image
ट्रेंडिंग

घरात चिडचिड होऊ नये, यासाठी काय करावं?

जगावर कोरोनाचे संकट असल्याने आणि देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे आपल्याला मनसोक्त घराबाहेर पडत येत नाही. अर्थात हे आपल्या काळजीसाठीच असलं तरी घरात राहून कंटाळा...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आश्चर्यम! लॉकडाउन असूनही ४२.२ किमीची मॅरेथॉन केली पूर्ण

लॉकडाउन संपून कधी एकदाचं घराबाहेर हिंडायला जातो, असं सध्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. पण काय आहे कि, लॉकडाउन असल्याने त्याचे नियम तर पाळावेच लागणार....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबईकरांनो काळजी घ्या! एका दिवसांत वाढले ५७ रुग्ण

मुंबई -राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढते आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ८१ रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. त्यापैकी ५७ रुग्ण एकट्या मुंबईत सापडले आहेत....
Read More