एचपीसीएल पाईप लाईनच्या खोदाईमुळे ट्रेलर अपघात – eNavakal
News अपघात महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र

एचपीसीएल पाईप लाईनच्या खोदाईमुळे ट्रेलर अपघात

उरण – तालुक्याला चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे रस्त्याची जागा ठिकठिकाणी खचली आहे. या शिवाय रस्त्यावरून उरण येथील बी.पी.सी.एल. येथून शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे जात असलेल्या एच.पी.सी.एल. कंपनीच्या गॅस पाईप लाईनचे काम मागील दीड वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे.या कामासाठी येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांनी परवानगी दिली असल्याने, या तथाकथित एच.पी.सी.एल.कंपनीच्या ठेकेदाराने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्याने या रस्त्यावर अपघातांचा कर्दनकाळ कोसळला आहे.

जेएनपीटी बंदरकडून उरण पूर्व विभागातील गोदामाकडे मालाचा भरलेला कंटेनर घेऊन चाललेला ट्रेलर या एच.पी.सी.एल. च्या सुरू असलेल्या गॅस लाईनच्या कामामुळे खोदाई झालेल्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठं-मोठे खड्डे पडले असून, या खड्यात सदर अवजड ट्रेलर कोसळला आहे. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र खोपटे – धसाखोशी गावाकडे जाणारा मार्ग बंद झाला असून, येथील नागरिकाची गावात जाण्याची गैरसोय झाली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

मुलांच्या आरोग्याची विचारपूस करून डोस द्या! आरोग्य सेविकांना सूचना

मुंबई – पालिकेमार्फत घरोघरी जाऊन लहान मुलांना विविध औषधांचे डोस दिले जातात. या औषधांची अ‍ॅलर्जी मुलांना होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी औषधांचा डोस पाजणार्‍या...
Read More
post-image
News मुंबई

दादर येथे पाच एकर जमीन विक्रीची बतावणी करुन फसवणूक

मुंबई – रायगड येथील कर्जतमध्ये पाच एकर जमिन विक्रीची बतावणी करुन एका व्यक्तीकडून घेतलेल्या साडेसात लाख रुपयांची फसवणुकीप्रकरणी भामट्याविरुद्ध दादर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे....
Read More
post-image
News मुंबई

सांताक्रुझमध्ये प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर! पालिकेची डोळेझाक

मुंबई – राज्य सरकारने 23 जूनपासून प्लास्टीक पिशव्यांच्या वापरांवर बंदी लागू केल्यानंतरही सांताक्रुझ (पुर्व) भागातील फेरीवाले व काही दुकानदार प्लास्टीक पिशव्यांचा सर्रास वापर करताना...
Read More
post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More