एकाच गावात 24 तासात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एकाच गावात 24 तासात दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

उस्मानाबाद – नापिकी, कर्जबाजारी व कुटुंबाचा उदरनिर्वाह या चिंतेने ग्रासलेल्या एकाच गावातील दोन शेतकऱ्यांनी २४ तासात आत्महत्या केल्याची हृदयस्पर्शी घटना उस्मानाबाद तालुक्याच्या हद्दीत असलेल्या तावरजखेडा येथे घडली. तावरजखेडा येथील २ जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ५५ वर्षीय शेतकरी शिवाजी जनार्धन सगर तर ३ जानेवारी रोजी ४७ वर्षीय शेतकरी श्रीपती गंपु फेरे यांनी आत्महत्या केली.

१९७२ च्या दुष्काळापेक्षाही २०१६ पासूनचा दुष्काळ तीव्र आहे, गेल्या ५ वर्षात जवळपास ६०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर २०१८ मध्ये उस्मानाबाद जिल्हयातील तब्बल १२८ शेतकऱ्यांनी कर्जामुळे आपली जिवन यात्रा संपवली, दुष्काळाबाबत शासन फक्त घोषणा करत आहे, मात्र उपाययोजनांच्या नावे कोणताच ठाम निर्णय घेतला जात नाही. दुष्काळामध्ये उपाययोजना महत्वाच्या असतात, कर्ज वसुली थांबली पाहिजे, हाताला काम व कामाला दाम मिळाले पाहिजे मात्र तसे काहीच दिसत नाही. शेतकऱ्यांवर बँकेचे व फायनान्सचे कर्ज, शेतातील नापिकी, कुटूंबाचा उदरनिर्वाह या चिंतेने शेतकरी आत्महत्या करत आहेत.

येत्या निवडणुकांच्या गडबडीत राज्यकर्ते व विरोधक कुरघोड्यांच्या राजकारणात व्यस्त आहेत, दुसरीकडे सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या तीव्र झळा बसत आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी दुष्काळ जाहीर केला मात्र कुठल्याही उपाय योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत अद्याप पोहचल्या नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्तेचे प्रमाण वाढत आहे. पाऊस न पडल्याने शेतात नापिकी तसेच डोक्यावर कर्जाचा भला मोठा डोंगर, घरात लग्नाच्या पाच मुली यामुळे चिंताग्रस्थ असलेल्या व फसव्या सरकारची कसलीही मदत मिळत नसल्यामुळे नविन वर्षाच्या सुरुवातीलाच उस्मानाबाद तालुक्यातील तावरजखेडाच्या दोन शेतकऱ्यांनी अवघ्या २४ तासात मृत्युला कवटाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More