एकमेकांवर टीका करणारे चक्क एकाच व्यासपीठावर – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

एकमेकांवर टीका करणारे चक्क एकाच व्यासपीठावर

नाशिक – नाशिकच्या पिंपळगावमध्ये शिवसेना आमदार अनिल कदम यांनी केलेल्या विविध कार्यक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, केंद्रिय मंत्री सुभाष भामरे, चंद्रकांत पाटील, गिरिश महाजन, दिपक सांवंत हे एकत्र होते. त्यामुळे एकमेकांवर आरोप करणारे आज एकाच व्यासपिठावर पहायला मिळाले. या वेळी दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून सरकारने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. तर भाषणातुन काहीशी एकमेकांवर टीकाही करण्यात आली.

गिरिश महाजनांनी आपल्यात कोणतेच वाद नाहीत, या वाक्यांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. आम्ही एकत्र आहोत, 300 कोटींच्या विकास कामांचे उद्घटन आम्ही एकत्र करतोय त्यामुळे आमच्यात वाद आहे, असं कोणाला जरी वाटत असेल तर त्यांनी हा कार्यक्रम पहावा, तुम्हाला समजेल याप्रकारचे मत महाजनांनी मांडले, त्यामुळे या भाषणातुन त्यांनी युतीचा हात पुढे केल्याचे सुत्रांकडून बोलले जात आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या भाषणाला प्रत्युत्तर देत, जोरदार फटकेबाजी केली आहे.

मला फटाकडे वाजवायची गरज नाही. मी सरकारवर टीकाही करत नाही. मी जनतेच्या बाजुने बोलतो, आता लख्ख प्रकाश लागण्याचे दिवस आले आहेत. आम्ही एकत्र आल्याचे कोणीही आश्चर्य वाटून घेऊ नका. सरकारने केलेल्या चांगल्या कामाचे मी नेहमीच कौतुक करतो, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुखांनी आपली बाजु स्पष्ट केली. ते पुढेही म्हणाले की यंदा दुष्काळाचे मोठे सावट राज्यावर आले आहे. गिरीशजी पाणी सोडण्यासोबतच माणसे जोडणेही तितकेच गरजेचे आहे, असे बोलून त्यांनी महाजनांवरती टोला लगावला आहे. राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्व एकत्र जाऊ असेही ते अखेरीस बोलले, त्यामुळे युतीच्या दृष्टीने हे भाषण किती महत्वाचे आहे. यावरच सर्वत्र चर्चा होत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More