एअर इंडियाच्या पायलटवर चौकशी होणार  – eNavakal
News देश

एअर इंडियाच्या पायलटवर चौकशी होणार 

नवी दिल्ली – एअर इंडियाच्या पायलटवर चौकशीची कुर्‍हाड कोसळली आहे. कारण आहे ते सहकार्‍याला कुर्‍हाडीचा धाक दाखवणे आपल्या ट्रेनी वैमानिकाला एकदा नाही तर तब्बल तीनवेळा कुर्‍हाडीचा धाक दाखवून घाबवरले आहे. या प्रकरणी ट्रेनी पायलटने तक्रार केल्याने आता एअर इंडिया प्रशासनाकडून या वरिष्ठ वैमानिकाची चौकशी सुरु करण्यात आली आहे. ट्रेनी पायलटने दिलेल्या तक्रारीनुसार, वरिष्ठ वैमानिक आम्हाला प्रशिक्षण देत होता. त्या दरम्यान त्याने आम्हाला काच फोडण्याची कुर्‍हाड दाखवली. ट्रेनी पायलट आपल्याला काय काम करायचे होते ते पाहात होता, मात्र वरिष्ठ वैमानिकाला हे न आवडल्याने त्याने कुर्‍हाडीचा धाक दाखवला असे ट्रेनी पायलटने म्हटले आहे. तर दुसर्‍या प्रसंगात एअर इंडियाचे विमान कोलकाताहून दिमापूरला चालले होते. या वेळी या वैमानिकाने आपल्याला कॉकपीटमध्ये कुर्‍हाडीचा धाक दाखवून घाबरवले असेही ट्रेनी पायलटने म्हटले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची तिसरी विकेट; शाकीब-अल-हसन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More