ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती

नवी दिल्ली – ऋषी कुमार शुक्ला यांची सीबीआयच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने हा निर्णय घेतला. शुक्ला हे १९८३च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. या समितीत पंतप्रधानांसह लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे आणि सरन्यायाधीशांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीने आज शुक्ला यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर एम. नागेश्वर राव यांच्याकडे हंगामी संचालकपद सोपवण्यात आले होते. मात्र राव यांच्या निवडीला कॉमन कॉज संस्थेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. तर कालच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची कानउघाडणी केली होती. शुक्ला यां कार्यकाळ नियुक्तीपासून दोन वर्षांचा असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

पक्षांतरामुळे भविष्यात मोठा राजकीय भूकंप! शिवस्वराज्य यात्रेत अजित पवारांचे भाकित

यवतमाळ – राज्यात पक्षांतराची लाट आली आहे. अनेक जण आपला स्वार्थ, स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी, शासनाचे अनुदान घेण्यासाठी, सत्ताधार्‍यांकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी पक्षांतर करत आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा

सावंतवाडी – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईहून गोव्याला जाणार्‍या जनशताब्दी एक्स्प्रेसला आता सावंतवाडी स्थानकात थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंडळाकडून...
Read More
post-image
News देश

‘पारले’ बिस्कीटला मंदीचा फटका! हजारो कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट

नवी दिल्ली – बिस्कीटांचे उत्पादन घेणार्‍या देशातील सर्वात मोठ्या पारले कंपनीलाही मंदीचा फटका बसला आहे. तसेच मागणी घटल्याने कंपनीने उत्पादनात कपात केली आहे. त्यामुळे...
Read More
post-image
News देश

प्रियांका चोप्राला यूएनच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरून हटवा

नवी दिल्ली- पाकिस्तानी मंत्र्याने बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला संयुक्त राष्ट्राच्या ‘सदिच्छा दूत’ पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे. पाकिस्तानातील मानवी हक्क खात्याच्या मंत्री शिरीन मझारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

चिदंबरम यांना दिलासा नाहीच! १६ तासांपासून फरार

नवी दिल्ली – आयएनएक्स मीडिया घोटाळ्याशी संबंधित भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग प्रकरणात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृह व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचा...
Read More