ऋषी कपूरची पुन्हा फालतू ट्विट; बनावट फोटोवर वादग्रस्त टिप्पणी – eNavakal
देश मनोरंजन

ऋषी कपूरची पुन्हा फालतू ट्विट; बनावट फोटोवर वादग्रस्त टिप्पणी

मुंबई- ‘ट्विटर’वरून वादग्रस्त ट्विट करण्यास प्रसिद्ध असलेले अभिनेते ऋषी कपूर यांनी पुन्हा एकदा स्वतःवर वाद ओढवून घेतला आहे. काल दोन वेगळ्या धर्मातील उपासक एकत्र येऊन मद्य प्रश्न करत आहेत, असा बनावट फोटो त्यांनी ट्विटरवरून शेअर केला. या ट्विटमुळे त्यांचे फॉलोअरने चांगलेच नाराज झाले असून नेटिझन्सनी त्यांना ट्रोल केले आहे. त्यांच्या या ट्विटला रविंद्र जडेजाने देखील ट्विट करून प्रत्युत्तर दिले आहे. याआधीही ऋषी कपूर यांनी अनेकदा ट्विटरवरून वादग्रस्त ट्विटकरत वाद ओढवून घेतले होते.

 

ऋषी कपूर यांनी दाखवलेल्या फोटोमध्ये हे दोघे मद्यप्राशन करत असल्याचे दिसत आहे. मात्र हा फोटो एडीट केला असल्याचे एका फॉलोअरने दाखवून दिले आहे. फॉलोअरने रिट्विटकरून खरा फोटो शेअर करत नकारात्मक भावना पसरवणे बंद करण्याचे आवाहन ऋषी कपूर यांना केले. खऱ्या फोटोमध्ये मुस्लीम धर्म उपासक हिंदू साधूला पाणी देत आहे. अनेकांनी खरा फोटो शेअर केल्यानंतर ऋषी कपूर यांनी वादग्रस्त ट्विट डिलीटकरून ट्विटद्वारे माफी मागावी असे म्हटले आहे. मात्र, ऋषी कपूर यांनी अजूनही हे ट्विट डिलीट केले नाही आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री पॉम्पिओ भारत दौऱ्यावर! पंतप्रधानांची घेतली भेट

नवी दिल्ली – अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून भिवंडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

भिवंडी – ३० वर्ष जुन्या इमारतीचा प्लास्टरचा भाग कोसळून कोसळून अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना भिवंडीच्या पद्मानगर भागात घडली आहे. गंगाजमुना या दुमजली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

गोव्यात मुसळधार पाऊस! जनतेला दिलासा

पणजी – गोव्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. येथे गेल्या आठवड्यात ७० टक्के कमी पावसाची नोंद करण्यात आली असल्याने पावसाच्या प्रतीक्षात असलेली जनता पावसाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

टायगर-दिशाचा ब्रेकअप! चाहत्यांमध्ये नाराजी

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटाणी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांनी आपल्या प्रेमाची कबुली कधीच उघडपणे दिली नाही. मात्र कधीच उघडपणे आपल्या रिलेशनशिपला नकारही दिला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यापूर्वी त्रालमध्ये चकमक

त्राल – जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये आज सकाळपासून चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात जंगलात ही चकमक सुरू असून दोन ते...
Read More