ऋषभ आणि पूजा ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर – eNavakal
मनोरंजन मुंबई

ऋषभ आणि पूजा ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर

मुंबई- रुपेरी पडद्यावर आजवर बऱ्याच जोड्या  लोकप्रिय  झाल्यात. यातील सर्व जोड्या कधी ना कधी प्रथमच एकत्र आल्या  होत्या.त्यातील अनेकांनी ऑंनस्क्रीन केमेस्ट्री बळावर रसिकांना मोहिनी घातली आहे. आर.पी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी  मराठी चित्रपटातील ऋषभ पडोळे व पूजा जैस्वाल ही नवी जोडी रसिकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज झाली आहे. या जोडीचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटाच्या निमित्ताने ही जोडी रुपेरी पडद्यावर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. २३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

नवीन असल्यामुळे सुरुवातीला काम करताना अवघडल्यासारखं वाटलं, पण दिग्दर्शक दिपक कदम यांनी आम्हाला समजून घेतल्यामुळे काम करताना मजा आली. आम्ही दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं असून आमची केमेस्ट्री प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला. ‘अॅट्रॉसिटी’ या कायद्याबाबत समाजात विशेष जागृती नाही ही जागृती व्हावी या उद्देशाने डॉ. राजेंद्र पडोळ यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे. या  दोघांसोबत या चित्रपटात यतिन कार्येकर, विजय कदम, गणेश यादव,  लेखा राणे, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, निखिल चव्हाण, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

सबरीमालात स्त्रियांनी प्रवेश केल्याने केरळ बुडाले

तिरुअनंतपुरम – रिझर्व्ह बँकेचे हंगामी निर्देशक एस गुरुमूर्ती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य केले आहे. केरळवर आसमानी संकट कोसळले असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू...
Read More
post-image
क्रीडा देश

#AsianGames2018 आशियाई क्रीडा स्पर्धेत यंदा पहिल्यांदाच 10 नवीन गेम्स

जकार्ता – 18 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा जकार्ता येथील गिलोरा बंग कर्नो स्टेडियमवर संपन्न झाला. या वर्षीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 10 नवीन गेम्स पहिल्यांदाच...
Read More
post-image
News देश

संगमनेर तालुक्यात भूकंप?

संगमनेर – तालुक्यातील घारगाव आणि माहुली परिसरात काल रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घारगाव आणि माहुली परिसरातील भूगर्भामध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे महाराष्ट्र

सचिन अणदुरेला ७ दिवसांची पोलीस कोठडी

औरंगाबाद – डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने शनिवारी धडक कारवाई केली. या कारवाईत सीबीआयने आरोपी सचिन अणदुरे याला औरंगाबादमधून अटक केली. आरोपी सचिन अणदुरेची...
Read More
post-image
गुन्हे देश

दिल्लीची मोस्ट वॉण्टेड ‘मम्मी’ अखेर गजाआड

नवी दिल्ली – तब्बल 113 गुन्ह्यांमध्ये आरोपी असलेली दिल्लीची मोस्ट वॉण्टेड फरार ‘मम्मी’ बशीरन हिला पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानची मुळ रहिवासी असलेली बशीरन ही...
Read More