सांगली – ऊसदरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. 11 नोव्हेंबरला सरकारविरोधात ऊसपट्ट्यात चक्का जाम करून बंद पुकारण्याची घोषणा आज खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगलीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. शेतकर्यांसाठी तिजोरी खाली करण्याची घोषणा करणार्या मुख्यमंत्र्यांचे घोडे कुठे अडले आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
ऊसदराच्या प्रश्नावर दिल्लीला जाण्याची मुख्यमंत्र्यांची हिम्मत नाही? की त्यांना दिल्लीत किंमत नाही, असा टोलाही शेट्टींनी लगावला. 10 नोव्हेंबरपर्यंत सरकारने उसाच्या दराबाबत निर्णय घ्यावा अन्यथा एकदिवस कडकडीत बंद पाळून लोकशाही मार्गाने चक्का जाम करण्याचा इशाराही त्यांनी दिला.