उष्ण लहरींचा काळ वाढणार! केंद्राकडून महाराष्ट्राला इशारा – eNavakal
महाराष्ट्र

उष्ण लहरींचा काळ वाढणार! केंद्राकडून महाराष्ट्राला इशारा

पुणे – भारतात यापुढे दरवर्षी उन्हाळा अधिक तीव्र होत जाणार आहे. तसेच उन्हाळ्याचा व उष्ण लहरींचा काळही वाढत जाणार आहे. जमिनीतील ओलावा नष्ट झाल्याने जमिनीतील उष्णता वातावरणात फेकली जात आहे. याचाच परिणाम म्हणून उष्ण लहरींची तीव्रता व त्यांचा काळ वाढणार आहे. भारतीय उष्ण कटिबंध हवामान अभ्यास संस्थानने (आयआयटीएम) महाराष्ट्राला खास इशारा दिला आहे. धरणातील  तळाला गेलेला पाणीसाठा, नष्ट झालेला मातीतील ओलावा यामुळे महाराष्ट्रातील रखरखीतपणा व उष्ण लहरींमध्ये वाढ होणार आहे.
भारत हा उष्ण कटिबंधातील देश आहे. या उष्ण तापमानात आता ‘अल निनो मोडोकी’ हे उष्ण हवामानाचे प्रवाह सुरू झाले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून 2020 ते 2064 या 44 वर्षांच्या कालावधीत दरवर्षी उष्ण लहरींची तीव्रता आणि काळ वाढत जाणार आहे. ‘अल निनो मोडोकी’ हा ‘अल निनो’ पेक्षा वेगळा हवेचा व तापमानाचा प्रवाह आहे. या भारतीय उष्ण कटिबंधातील हवामान अभ्यास संस्थानने 1961 पासून 2005 साली पर्यंतच्या 54 उष्ण लहरींचा अभ्यास केला आहे. 2020 ते 2064 पर्यंत 138 उष्ण लहरी येण्याची शक्यता वर्तविली आहे. या हवामान संस्थेने महाराष्ट्रासहीत गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश व तामिळनाडू या राज्यांना या उष्ण लहरींचा सर्वात जास्त फटका बसणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र राजकीय

बीडमध्ये काकांच्या कारभारावर पुतण्याचा बॅनरबाजीतून निशाणा

बीड- बीडच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच काका-पुतणे आमने-सामने उभे राहणार असल्याने त्यांच्यातील संघर्ष गल्लीबोळातही दिसू लागला आहे. राज्याचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या विकासकामांवर त्यांचे पुतणे संदीप...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेससोबत युती नको, स्वतंत्र लढणार – देवेगौडा

बंगळुरू- कर्नाटकामध्ये मध्यावधी निवडणूक होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर कोणासोबतही युती न करता स्वतंत्र लढण्यासाठी तयार राहू, असे माजी पंतप्रधान आणि जनता...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा पूर्ववत

उरण- उरण ओएनजीसीच्या गॅस प्रकल्पाला लागलेल्या आगीमुळे गेल्या 10 दिवसांपासून बंद असलेला महानिर्मितीच्या उरण वीज प्रकल्पाचा गॅसपुरवठा कालपासून पूर्ववत सुरू झाला आहे. यामुळे एका...
Read More
post-image
News महाराष्ट्र वाहतूक

बोरोटी रेल्वे यार्डमध्ये ब्लॉक! कलबुर्गी-सोलापूर पॅसेंजर रद्द

सोलापूर- मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील सोलापूर वाडी सेक्शनच्या बोरोटी रेल्वे स्थानक यार्डमध्ये उद्या बुधवारी ट्रॉफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या काळात प्रवासी गाड्यांमध्ये...
Read More
post-image
News महाराष्ट्र राजकीय

इंदुरीकर महाराजांचा मलाच पाठिंबा! बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया

अहमदनगर- संगमनेरयेथे मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज दिसल्यानंतर ते बाळासाहेबांच्या विरोधात लढणार असल्याच्या चर्चांना वेग आला होता. मात्र स्वत: इंदुरीकर महाराजांनी हे वृत्त...
Read More