उल्हासनगरमध्ये दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न – eNavakal
अन्य मुंबई

उल्हासनगरमध्ये दोन पुस्तकांचे प्रकाशन सोहळा संपन्न

उल्हासनगर – उल्हासनगर येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप मालवणकर यांचें हार प्रहार तर पेशाने शिक्षक असणारे शांताराम निकम यांचें कडु डोस अश्या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा येथील कालिका कला मंडळाच्या हॉल मध्ये प्रचंड उत्साह आणि रासिकांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला.

‘हार प्रहार’  आणि ‘कडु डोस’ ही दोन्ही पुस्तके समाजातील विविध अपप्रवृत्तीवर तूटून पडणारी असून, समाजातील मैत्री, प्रेम, आपुलकी आणि करुणा या मानवी मूल्याचा पुरस्कार करणारी आहेत.

श्याम गायकवाड यांनी दिलीप मालवणकर आणि शांताराम निकम हे दोघे भिन्न राजकीय किंबहुना विरोधी विचार सारणीतून उगवलेली व्यक्तिमत्व असून त्यांचे समाजातील विविध पैलूचे आकलन या दोन पुस्तकातून पाहण्यास मिळते पत्रकार किरण सोनावणे म्हणाले की, साहित्य कुठले लिहिले जाते वाचले जाते आणि जगात कुठल्या साहित्याची दखल घेतली जाते यावरून देशाच्या सांस्कृतिक दर्जा आणि मनोवस्था जाणता येते. आपल्याकडे अजूनही लेखनाकडे छदं, हौस, मिरविणे अश्या दृष्टीने पाहिले जाते, शिवाय अजूनही देश, जात, धर्म, लिंग आणि भाषा अश्या कप्पेबाज मानसिकतेत येथील बहुसंख्य साहित्यिक आणि विचारवंत अडकले असल्याने विश्व मानव या भूमिकेतून किंवा उभ्या जगाने दखल घ्यावी असे फारसे लिहिले गेलेले नाही, त्यामुळे एक नोबल पुरस्कार आणि 4/5 बुकर पुरस्कार यापेक्षा जागतिक पातळीवर आपली फार कमाई नाही.

अमेझॉन, फिल्पकार्ट यावरून लोक कोणती पुस्तके खरेदी करतात हे पाहिले तर धक्का बसतो, मेलुवा, नाग, नार्निया सोबत बाळंतपणात काय काळजी घ्यावी, यशस्वी कसे व्हावे, धंदा कसा वाढवा या विषयाला वाहिलेली पुस्तके जास्त वाचली जातात. मराठीत आजही पूल, वपु, भावे, अत्रे , सावरकर, खांडेकर, यांचीच पुस्तके वाचली जातात असे दिसते. त्यामुळे नवीन साहित्य निर्माण करण्यासाठी झपाटून आणि झोकून देणाऱ्या कलंदर लोकांची गरज साहित्यात आहे असे प्रतिपादन किरण सोनावणे यांनी केले. कार्यक्रमात सिद्धार्थ मोरे आणि अरुण म्हात्रे यांनी कविता गाणी यांचे वेगवेगळे बाज सादर करून रंग भरले रसिकांनी कार्यक्रमाला भरभरून दाद दिली आणि दोन्ही पुस्तकांची हॉल वर बऱ्या पैकी विक्री झाली. यावेळी कविवर्य अरुण म्हात्रे, पत्रकार राजा अदाते, श्याम गायकवाड़, सिद्धार्थ मोरे, तुषार राजे, संतोष पवार, किरण सोनावणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

होर्डिंग लावल्याने कोणाला तिकीट मिळत नाही; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली दिलगिरी

पुणे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या मार्गावर बेकायदा होर्डिंग लावण्याचा सपाटा सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. या होर्डिंगमुळे...
Read More