उल्हासनगरमध्ये रद्द झालेला घनकचरा कर प्रस्ताव पुन्हा आणण्याचा प्रयत्न – eNavakal
News महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये रद्द झालेला घनकचरा कर प्रस्ताव पुन्हा आणण्याचा प्रयत्न

उल्हासनगर- – शहरात घन कचरा टॅक्स लागु करण्याचा प्रस्ताव गेल्या मार्च महिन्यात रद्द झालेला असताना पुन्हा या टॅक्सचा प्रस्ताव 15 सप्टेंबर रोजी होणार्‍या महासभेत येत आहे. त्यामुळे शहरातील नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत.

उल्हासनगर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी 27 मार्च 2018 रोजी महासभेत 68 कोटी रुपयांचा घन कचरा टॅक्सचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी आणला होता. परंतु नगरसेवकांच्या तीव्र विरोधाने तो प्रस्तावच रद्द करण्यात आला. मात्र पुन्हा हा प्रस्ताव 15 सप्टेंबर रोजी होणार्‍या महासभेत घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर शहरातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात बोजा पडणार आहे. शहरातील नागरिक व व्यापारी वेळेवर आपला मालमत्ता कर भरतात तरीपण हा घन कचरा टॅक्स लावण्याचे कारण काय असा प्रश्न व्यापारी विचारत आहेत. या घन कचरा टॅक्सच्या माध्यमातून नगरसेवक आणि ठेकेदार मात्र मालामाल होतील अशी चर्चा सुरू आहे. शहरातील नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही. रस्ते चांगले नाहीत.  साफसफाई होत नाही. सर्वत्र खड्ड्याचे सांम्राज्य. याकडे सत्ताधारी यांचे लक्ष नाही. 15 सप्टेंबर रोजी होणार्‍या महासभेत हा प्रस्ताव रद्द कण्यात यावा अशी मांगणी शहरवासीय आणि व्यापारी यांची असून या पुढे हा प्रस्ताव कधीच यायला नको. असही म्हणणे व्यापार्‍यांचे आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

दुरान्तो एक्स्प्रेसवर दरोडा; चोरटे एसी डब्यात घुसले

दिल्ली- रेल्वे मार्गावरचे सिग्नल फेल करून जम्मू-दिल्ली दुरान्तो एक्स्प्रेसचे दोन डबे लुटल्याची घटना आज पहाटे साडेतीनच्या सुमारास बादली-सराय रोहिल्ला स्टेशनदरम्यान घडली आहे. पहाटे तीनच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More