उल्हासनगरमध्ये इमारत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उल्हासनगरमध्ये इमारत कोसळली! सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

उल्हासनगर – परिसरातील ५ मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. लिंकरोड भागात असलेल्या या इमारतीचे नाव महक असे आहे. सोमवारी सकाळी या इमारतीला तडे गेल्याचे व इमारत एका बाजूला झुकल्याचे लक्षात येताच महापालिकेने त्यातील ३१ कुटुंबांना घर रिकामी करण्याचे आदेश देत ही इमारत सील केली होती. त्यामुळे आज या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, उल्हासनगर शहरात गेल्या महिन्यातच एका इमारतीचा स्लॅब कोसळून अडीच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शहरातील धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. त्यातच सोमवारी पहाटे उल्हासनगर कॅम्प नंबर दोन भागातील लिंकरोड परिसरात असलेली महक या इमारतीतील १०२ फ्लॅटचे दरवाजे आतून उघडत नव्हते. त्यामुळे घाबरलेल्या रहिवाशांनी याबाबत अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत, या फ्लॅटचा दरवाजा उघडला. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेत इमारतीची पाहणी केली. त्यावेळी इमारतीचा खांब खचल्याची बाब निदर्शनास आली. त्यानंतर रहिवाशांना पंधरा मिनिटांची वेळ देत, घरातील मौल्यवान वस्तू सोबत घेऊन इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली असून जवळपास १०० जणांचे प्राण वाचले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

राज्यातील महापूर मानवनिर्मित ! न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली समिती नेमा

सातारा,- कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही मानवनिर्मित आहे, असा दावा करून भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा होऊ नये म्हणून प्रशासनाची जबाबदारी निश्‍चित करण्यात यावी असे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

मुक्ताईनगरमधून मीच लढणार! माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेेंचे वक्तव्य

जळगाव- येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगरमधून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार असल्याचे वक्तव्य माजी महसूल मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा शक्ती केेंद्र...
Read More
post-image
News मुंबई

जोगेश्वरीत किटकनाशक पिऊन नवविवाहीत महिलेची आत्महत्या

मुंबई – जोगेश्वरी येथे एका 25 वर्षांच्या नवविवाहीत महिलेने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सोनी रोहित चौरसिया असे या महिलेचे नाव...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नरेेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण! विक्रम भावेचा जामीन फेटाळला

पुणे – अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात संशयित आरोेपी म्हणून अटक करण्यात आलेल्या विक्रम भावेचा जामीन अर्ज आज जिल्हा सत्र...
Read More
post-image
News महाराष्ट्र

विक्रमगडमधील पूल मोजताहेत शेवटची घटका

विक्रमगड – तालुक्यातील अनेक वर्षापासूनचे पूल मोडकळीस आले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ब्रिटीशकालीन विक्रमगड-गडदे मार्गावरील तांबडी नदीचा पूल, साखरे गावातील देहेर्जे नदीवरील पूल, नागझरी बंधारा...
Read More