उर्वशी चुडावालाच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी – eNavakal
News मुंबई

उर्वशी चुडावालाच्या अटकपूर्व जामिनावर मंगळवारी सुनावणी

मुंबई – जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी शारजील इमाम याच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याप्रकरणी देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याने वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या सामाजिक कार्यकर्त्या उर्वशी चुडावाला यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती एस.के. शिंदे यांनी याची दखल घेऊन याचिकेची सुनावणी मंगळवार, 11 फेबु्रवारीला निश्‍चित केली आहे. इमामच्या विरोधात राष्ट्रद्रोहासह अनेक गंभीर गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली असतानाच काही दिवसांपूर्वी त्याच्या समर्थनार्थ आझाद मैदान येथे एलजीबीटीक्यू समाजघटकांच्यावतीने निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात चुडावाला यांनी शारजीलच्या समर्थनासाठी घोषणाबाजी केली. तर आंदोलनाआधी सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टही लिहिली, असा आरोप पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये म्हणून चुडावाला हिने सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी दिलासा देण्यास नकार दिला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More