उर्जित पटेलना हटवताच रिझर्व्ह बँकेने सरकारला २८ हजार कोटी मंजूर केले – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

उर्जित पटेलना हटवताच रिझर्व्ह बँकेने सरकारला २८ हजार कोटी मंजूर केले

नवी दिल्ली – रिझर्व्ह बँकेचे माजी संचालक उर्जित पटेल यांनी बँकेकडे असलेल्या राखीव निधीतून सरकारला 30 हजार कोटी रुपये देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना हटवून शक्‍तीकांता दास यांची बँकेच्या संचालकपदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर दिल्या मीठाला जागून शक्‍तीकांता दास यांनी केंद्र सरकारला अंतरिम लाभांश म्हणून 28 हजार कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या हाती इतकी मोठी रक्कम आल्याने त्याचा सरकारला भरपूर फायदा होणार आहे.

रिझर्व्ह बँकेचे आर्थिक वर्ष जुलैत संपत असल्याने सध्या मार्च महिन्यात सरकारला अंतरिम लाभांशाची 28 हजार कोटींची रक्कम देण्यात आली. जुलै अखेर पुढील हप्ता दिला जाईल. 2013-14 ला 52,679 कोटी, 2014-15 मध्ये 65,896 कोटी, 2015-16 मध्ये 65,876 कोटी, 2016-17 मध्ये 30,659 कोटी आणि 2017-18 मध्ये 50,000 कोटी इतकी रक्कम रिझर्व्ह बँकेने सरकारला दिली आहे. सध्या सरकारची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बँकेने दिलेली मदत महत्त्वाची आहे. ही रक्कम जनतेपर्यंत पोचली तर निवडणुकीत सरकारला फायदा होणार आहे. सरकारने खरेतर अंतरिम लाभांश म्हणून 40 हजार कोटींचा निधी मागितला होता. पण रिझर्व्ह बँकेची गरज आणि हिशेबाचे धोरण लक्षात घेऊन बँकेने 28 हजार कोटीच देण्याचा निर्णय घेतला. मात्र ही मदतही मोठी आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – हिंदुत्व व राम मंदिराचा मुद्या पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शनिवारी अयोध्येमध्ये हिंदू धर्माचे शंकराचार्य यांच्यासहित डझनभर संत-महंत तसेच भाजपा व संघाचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : अमेरिकन अभिनेते स्टॅन लॉरेल

आज अमेरिकन अभिनेता, लॉरेल व हार्डीचा अर्धा भाग स्टॅन लॉरेल यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म. १६ जुन १८९० साली झाला. साल १९२६पासून या जोडीने खरी...
Read More
post-image
देश विदेश

फादर्स डे निमित्त गुगलचं खास डूडल

नवी दिल्ली – आज १६ जून फादर्स डे. या दिनानिमित्त गुगलने खास डूडल तयार केलं आहे. या डूडलमधून वडील आणि मुलामधलं निखळ नातं दाखविलं...
Read More