उरी हल्ल्याचा जबाब द्यायला भारतीय जवानांकडे शस्त्रे नव्हती – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

उरी हल्ल्याचा जबाब द्यायला भारतीय जवानांकडे शस्त्रे नव्हती

नवी दिल्ली – एकीकडे भाजपाचे नेते आणि स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुलवामा हल्‍ला व बालाकोट एअर स्ट्राईकच्या नावाने निवडणुकीत मते मागत आहेत. तर दुसरीकडे सीमेवर लढणार्‍या जवानांकडे शस्त्रे नाहीत. जवानांच्या पराक्रमाचा मतांसाठी वापर करणार्‍या मोदींच्या राज्यातही जवानांना शस्त्रे मिळाली नाहीत. त्यामुळेच उरी हल्ल्याला उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराकडे पुरेशी शस्त्रे नव्हती.

भारतीय लष्कराला व हवाई दलाला ‘ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डकडून शस्त्रास्त्रे व दारुगोळा पुरविला जातो. या ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्डाकडून मिळणारी 21,500 कोटींची शस्त्रे व दारुगोळा आणि काडतुसे गेल्या 10 वर्षांत सातत्याने उशिरा मिळत आहेत. या संदर्भात लष्कराने संरक्षण मंत्रालयाला 15 पानांचा एक रिपोर्टसुद्धा सादर केला आहे.
2009 ते 14 मध्ये 14 हजार कोटींची शस्त्रे मिळायला हवी होती. मात्र ती शस्त्रे वेळेवर मिळाली नाहीत. मोदींच्या 2014 ते 2019 या काळात 7,500 कोटींची शस्त्रास्त्रे मिळायला पाहिजे होती. तीही वेळेवर मिळाली नाहीत. शिवाय जी काडतुसे मिळाली. त्यामुळे अनेक जवान सीमेवर लढताना मृत्युमुखी पडलेकिंवा जखमी झाले. उरीमध्ये भारतीय लष्कराच्या तळावर दहशतवादी हल्‍ला झाला त्यावेळी त्या हल्ल्याला जबाब द्यायला भारतीय लष्कराकडे शस्त्रास्त्रे नव्हती. त्यानंतर घाईघाईने 11,740 कोटी रुपयांचे 19 शस्त्र करार करण्यात आले. त्यात रशियाकडून स्मार्क रॉकेट, टँक गायडेड मिझाईल, टी-90 आणि टी-72 टँक आदी शस्त्रांचा समावेश होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पुजार्‍यांना मंदिराच्या ट्रस्टी बनण्यापासून रोखता येणार नाही! हायकोर्टाचा निर्णय

मुंबई – राज्यातील मंदिरातील पुजारी तसेच अन्य काम करणार्‍या व्यक्तींची सेवा ही मंदिराच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांना मंदिराच्या विश्वस्त पदी नियुक्त करण्यापासून रोखता येणार...
Read More
post-image
News मुंबई

मुलाच्या शिक्षणाच्या झालेल्या भांडणातून पत्नीची हत्या! पती फरार

मुंबई – मुलाच्या शिक्षणावरुन झालेल्या भांडणातून एका 30 वर्षांच्या महिलेची तिच्याच पतीने गळा आवळून हत्या केल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. हत्येनंतर पतीने पत्नीने आत्महत्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

पालिकेची वृक्षप्राधिकरण समिती स्थापन! ठाणे महापालिकेची न्यायालयात माहिती

मुंबई – ठाणे महापालिकेने वृक्ष प्राधिकरण समिती आणि त्या समितीवरील सदस्यांची नेमणूक ही नियमानुसार स्थापन करण्यात आल्याची माहिती ठाणे महा पालिकेने आज उच्च न्यायालयात...
Read More
post-image
News मुंबई

वांद्रे स्कायवॉक ऑडीटसाठी बंद! मुंबई महापालिकेची हायकोर्टात माहिती

मुंबई – लाखो प्रवाशांसाठी उभारण्यात आलेला वांद्रे स्थानकातील स्कायवॉकचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यात येणार आहे. त्यासाठी तो बंद ठेवण्यात आल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

भारताचे माजी अर्थमंत्री चिदंबरम्ना ड्रामाबाजीनंतर अटक

नवी दिल्ली-आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर बेपत्ता असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर आज रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर...
Read More