उरण परिसरात फ्लेमिंगोंचे थवे दृश्य टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी – eNavakal
News महाराष्ट्र

उरण परिसरात फ्लेमिंगोंचे थवे दृश्य टिपण्यासाठी पक्षीप्रेमींची गर्दी

उरण- उरण परिसरातील जेएनपीटी बंदरावरील खाड्या, जलाशये आणि पाणथळ जागांवर आता आकर्षक गुलाबी रंगाचे फ्लेमिंगोंचे थवे दिसू लागले आहेत. त्यामुळे काळ्या चिखलांनी भरलेला खाडी परिसर गुलाबी बनला होता.

उरण परिसरात विस्तिर्ण जलाशय, खाड्या आणि पाणथळ जागी स्थलांतरीत दुर्मीळ जलचर पक्ष्यांची नेहमीच गर्दी असते. जलाशय, खाड्यांत शेवाळ, प्रवाळ, खुबे, छोटे-मोठे मासे, कृमी-किटक, शंख-शिंपले विपुल प्रमाणात आढळतात. यामुळे दरवर्षी लाखो स्थलांतरीत आणि जलचर पक्षी येथे आणि उरण परिसरात मोठ्या संख्येने येतात. यामध्ये प्रामुख्याने फ्लेमिंगो, पेलिकन, करकोचा, माळढोक आणि इतर अनेक जातींच्या जलचर पक्ष्यांचा समावेश असतो. एरव्ही पावसाळा सुरू होताच फ्लेमिंगो स्वदेशी माघारी परततात.  मात्र यावर्षी पावसाळ्यातच फ्लेमिंगोंचे उरण परिसरात आगमन झाल्याने पक्षीप्रेमीही सुखावले असून त्यांच्या विलोभनीय हालचाली टिपण्यासाठी पक्षीप्रेमींनी उरणमध्ये एकच गर्दी केली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कमलनाथ की ज्योतिरादित्य? गेहलोत की सचिन पायलट? अनुभवी की युवा?

जयपूर – राजस्थानात काँग्रेस पक्षाला पूर्ण बहुमत मिळाल्याने आजच सायंकाळी 7 वाजता राजभवनात मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पाडण्याचा निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला. मात्र निवडणूक निकाल...
Read More
post-image
मुंबई

मुंबईतील पाणी प्रश्न स्थायी समितीत पेटला

मुंबई  – मुंबईतील पाणी प्रश्न आज बुधवारी पालिका स्थायी समितीत चांगलाच पेटला सर्वपक्षीय सदस्यांनी आक्रमक होत पालिकेला धारेवर धरले पाणी टंचाईचा प्रश्न सोडवण्याची मागणी...
Read More
post-image
देश

चंद्रशेखर राव आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

हैदराबाद – तेलंगणा राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव हे उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ़घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीसाठी विविध राजकीय पक्षांचे नेते, निमंत्रित पाहुणे उपस्थित...
Read More
post-image
मुंबई

मुंबईत वातावरणातील बदलाने आजार बळावले

मुंबई – दिवसा रणरणते ऊन आणि रात्रीचा गारवा वातावरणातील या बदलामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे. सर्दी, खोकला, दमा, त्वचारोगांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डिसेंबर...
Read More
post-image
विदेश

ब्राझीलच्या कँपीनास शहरात गोळीबारात 5 ठार

साओ पाउलो- ब्राझीलच्या कँपीनास शहराती एका चर्चमध्ये बंदुकधार्‍याने केलेल्या गोळीबारात 5 भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली. या घटनेनंतर गोळीबार करणार्‍या व्यक्तीनेही स्वतःवर गोळ्या...
Read More