उरणकरांनो सावधान! कुंडेगावात घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसू लागले – eNavakal
महाराष्ट्र

उरणकरांनो सावधान! कुंडेगावात घरांमध्ये समुद्राचे पाणी घुसू लागले

उरण – उरण तालुक्यात औद्योगिक विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी भरावाचे काम सुरू आहेत. ही कामे सुरू असताना नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र बंद केले जात असल्याने समुद्राच्या भरतीचे पाणी आता घरांना घुसू लागले आहे. गेली अनेक दिवसांपासून अशा परिस्थितीचा सामना कुंडेगावातील ग्रामस्थांना करावा लागत रात्र रात्र जागून काढावी लागत आहे.

आज घटनास्थळी सिडको अधिकारी मांगले यांना घेऊन जिप सदस्य विजय भोईर, पंस सदस्य दीपक ठाकूर, सरपंच आरती चोगले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक होऊन यातून आमची सुटका कधी होणार अशी आरोळी देत होते. न पेक्षा आगामी निवडणुकीत आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल अशी चर्चा सुरू होती.  आज जरी कुंडेगावात पाणी शर्ट असले तरी भविष्यात तालुक्यातील अनेक गावांत पाणी घुसण्याची शक्यता असल्याने उरणकरांनी सावधान होण्याची गरज आहे.

कुंडेवगावामधील घरांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्याने येथिल नागरिकांच्या सामानाचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सिडको अधिकार्‍यांनी गावाची पाहणी केली असून, योग्यते उपाय करण्याचे आश्वासन दिले आहे. तर ग्रामस्थांनी याला सर्वस्वी सिडको व रिलायन्स कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले.  फाल्गुन पौर्णिमेच्या पासून आमावसेपर्यंतच्या काळामध्ये समुद्राला मोठे उधाण येते. म्हणजेच या काळामधील 15 दिवस मोठी भरती असते. या मोठ्या भरतीचा फटका उरण तालुक्यातील गावांना बसु लागला आहे. सिडकोच्या विकासकामांसाठी होणार्‍या भरावांमुळे येथील पारंपारिक गावे आता पाण्याखाली येऊ लागली आहेत. अशाच प्रकारे उरण तालुक्यातील कुंडेगाव गेली चार दिवस समुद्राच्या मोठ्या उधाणामुळे पाण्याखाली

आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी डॉ. नीलम गोऱ्हेंची बिनविरोध निवड

मुंबई – विधान परिषदेतील उपसभापतीपदी अखेर शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून काँग्रसेचे गटनेते विजय वडेट्टीवार यांना देण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More