उमेदवार निवडीत भाजपा धोका पत्करायला तयार नाही – eNavakal
देश निवडणूक

उमेदवार निवडीत भाजपा धोका पत्करायला तयार नाही

गुजरात निवडणुकीसाठी भाजपाने सर्वात आधी 70 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. सेफ गेम करून 50 आमदारांना पुन्हा तिकीट देऊन भाजपाने आपला सावध पवित्रा दाखविला आहे. नरेंद्र मोदी गुजरातमध्ये सत्तेवर होते तेव्हा ‘नो रिपीट’ची थेअरी वापरायचे. पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे. ‘बहुत कठीण है डगर पनघटकी’ म्हणून नवीन प्रयोग करायचा खेळ करीत नाहीत. 17 मंत्र्यांना पुन्हा तिकीट मिळाले आहे आणि पहिल्याच यादीत 15 पाटीदारांना तिकीट मिळाले. 70 मध्ये 4 महिलांना जागा मिळाल्या आहेत. 1 महिला आमदार वर्षाबेन दोशी यांना वढवा येथून पुन्हा तिकीट मिळाले नाही आणि एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकिट देण्याचे धारिष्ट्य भाजपाने दाखविले नाही.
सोशल इंजिनिअरिंगच्या संकल्पनेनुसार ओबीसींना सगळ्यात जास्त जागा देण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान आहे. त्यापैकी 42 जागांचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. आता पाटीदारांच्या क्षेत्रामध्ये काँगे्रसवाले कोणाची नावे जाहीर करतात त्याची वाट बघून पुढची हालचाल होईल. पण समस्या आहे की नंतरच्या उमेदवारांना प्रचाराला वेळ कमी पडेल. म्हणजे जेमतेम 15 ते 20 दिवस सगळ्यात जास्त उत्सुकता याबद्दल होती की काँगे्रसमधून भाजपामध्ये आलेल्या 14 आमदारांपैकी किती जणांचा नंबर लागेल. सध्यातरी 5 जणांचा नंबर लागला आहे. सौराष्ट्रमध्ये 2 आणि उत्तर गुजरातमध्ये 3. दरम्यान, आता पुढील यादीची प्रतीक्षा आहे. गेल्या वेळी पडलेल्यांपैकी 7 जणांना पुन्हा संधी मिळाली आहे. उत्तर गुजरातमध्ये एक आयपीएस बरंडा यांना संधी मिळाली आहे. अजूनही बर्‍याच माजी सनदी अधिकार्‍यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये तरुण मतदारांचे प्रमाण 40 टक्क्यांहून जास्त आहे. पण 25 ते 35 शीतील दोनच तरुणांना संधी मिळाली आहे.
आणखी एका गोष्टीने जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. सर्वसाधारणपणे दिल्लीमध्ये संसदीय समितीची बैठक झाली की त्वरित उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येते. पण यावेळेला 48 तासांनंतर यादी जाहीर करण्यात आली आणि पक्षप्रमुख अमित शहा यांनी कुठूनही विरोधाचा सूर उमटू नये, बंड होऊ नये याची पूर्ण दक्षता घेऊनच यादी जाहीर केली.
तरीपण कुठेकुठे थोडी थोडी धुसफुस सुरू झाली आहे. तिचा निकाल लावायला पक्षश्रेष्ठी समर्थ आहेत. त्यांना माहित आहे की, भाजपमधील असंतुष्ठांचे तुष्टीकरण करण्याची कोणाचीही कुवत नाही, जातील कुठे?
एनसीपी आणि जेडीयू
सूर जुळतील का?
गुजरातमध्ये काँग्रेस, एनसीपी आणि जेडीयू यांची आघाडी होईल का? ही गोष्ट अजून स्पष्ट झालेले नाही. काँग्रेसकडून एनसीपीसाठी किती जागा सोडल्या जातील, त्यावर पुढचे हिशेब ठरणार आहेत. जेडीयूसोबत युतीच्या शक्यता संपल्यात जमा आहेत. नुकतेच जेडीयूचे राष्ट्रीयस्तरावर विभाजन आले आहे आणि एका जेडीयूचे प्रमुख आपले शरद पवार आहेत. गुजरात जेडीयूचे प्रमुख छोटू वसावा यांनी बाण या निशाणीवरचा हक्क सांगण्यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. पण बाण मिळाला तो नितीशकुमारांच्या जेडीयूला आता छोटू वसावांचे काय होणार? मध्य गुजरातमधील आदिवासी भागात वर्चस्व असलेले छोटूभाई स्वतःच्या ताकदीवर निवडून येत असतात. त्यांनी काँग्रेसकडे 10 जागा मागितल्या खर्‍या, पण सगळे ऐकले तर ती काँग्रेस कसली? राज्यसभेच्या निवडणुकीत वसावा यांनी काँग्रेसच्या अहमद पटेलांसाठी मतदान केले होते. हे उपकार स्मरून दोन तीन जागा सोडून ॠणनिर्देश व्यक्त करतीलही काँग्रेसवाले पण अशा स्थितीत “कैसे मिले सूर मेरा तुम्हारा?” अशीच शक्यता आहे.
राजकोटमध्ये अटीतटीची हायप्रोफाईल लढत
राजकोट पश्चिममधून मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अनेक तर्कवितर्कांना विराम मिळाला आहे आणि काँग्रेसतर्फे जरी अधिकृत घोषणा झालेली नसली तरी ही लक्ष्मीपुत्र श्रीयुत इन्द्रनील राजगुरू उभे राहाणार आहेत. इन्द्रनील यांनी गेल्यावर्षीपासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या वेळी त्यांनी राजकोट 68 या जागेवरून निवडणूक लढविली होती आणि भाजपाच्या कश्यप शुक्लांना 4500 च्या अल्प मताधिक्याने हरविले होते. पण यावेळी त्यांनी मोठे साहस करून सरळ मुख्यमंत्र्यांनाच भिडण्याचे ठरवले आहे आणि तसे ते जाहीरपणे बोलतातही की, मला मुख्यमंत्र्यांनाच हरवायचे आहे.
एक वर्ष आधीपासून त्यांनी तयारी सुरू केली आहे. वास्तविक ही जागा म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला. गुजरात सरकारमध्ये अर्थमंत्र्यांची खुर्ची सर्वाधिक काळ सांभाळणारे वजूभाई वाळा येथून तब्बल 6 वेळा निवडून आलेल आहेत. याच सीटवरून मोदी यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर 15000 मतांनी विजय मिळविला होता. वजुभाईंनीच त्यांच्यासाठी पदत्याग केला होता. सद्याचे मुख्यमंत्री विजय रुपाणी 2014 साली झालेल्या निवडणुकीत 2500 मतांनी विजयी झाले होते. भाजपाच्या निशाणीवर येथून कोणीही निवडून येऊ शकेल, असा या जागेचा महिमा आहे.
पण इंद्रनिल यांनी विजय रुपाणींच्या वाटेत तरीच आव्हाने उभी केली आहेत. इन्द्रनील एक प्रथितयश व्यावसायिक आहेत. बिल्डर आहेत. हॉटेलियर आहेत. हजारो एकर जमिनीचे मालक आहेत. गेल्या निवडणुकीवेळी त्यांनी 125 करोडची अधिकृत संपत्ती जाहीर केली होती.
इन्द्रनील यांनी मागील 6 महिन्यांत आपल्या मतदारसंघात कार्यक्रमांचा धडाकाच लावला आहे. काही ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र खाण्यापिण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. राजकोटची जनता सध्या अभूतपूर्व असे पोस्टर आणि बॅनरसुद्धा पहात आहे. एकही रस्ता आणि गल्लीबोळ त्यांच्या पोस्टरपासून सुटलेला नाही. याच जागेवर कदाचित सगळ्यात जास्त पैसे उधळले जातील इन्द्रनील यांचे वडील राजकोट जिल्हा परिषदेचे सर्वात तरुण अध्यक्ष होते. स्वतः इन्द्रनील काँग्रेसचे शहर प्रमुख आहेत. भाजपाच्या आतल्या गोटातून आवाज येत आहे. की, ‘से लडाई हैं, पैसे की, और इन्सान की,’ भाजपाला खात्री आहे की, राजकोटच्या मातीत आपल्याला दगाफटका होणार नाही.पण ‘ये रास्ते नही आसान’, पटेल समुदायाचे 60000 मतांचे राजकारण ज्याला जमले तो जिंकला, पाटीदार आंदोलनाचा किती प्रभाव पडेल, हे सांगणे कठीण असले तरी हार्दिक पटेल काँग्रेससाठी प्रचार करण्याची शक्यता आहे. शत्रुचा शत्रू तो आपला मित्र बाकी अन्य काय…

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली

मुंबई – मीरा-भाईंदर येथील डोंगरी परिसरात केसरबाई ही चार मजली इमारत कोसळली आहे. या निवासी इमारतीच्या ढिगाऱ्यात जवळपास ५० जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

कोस्टल रोडच्या नव्या कामाला न्यायालयाचा लाल झेंडा

मुंबई – राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मरिन ड्राईव्ह ते बोरीवलीच्या कोस्टल रोडलाच्या नव्या कामाला मुंबई उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र

बुलढाण्यात कारमध्ये गुदमरून दोन मुलांचा मृत्यू

बुलढाणा – कारमध्ये गुदमरून दोन बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बुलढाण्यात घडली आहे. तर एक पाच वर्षांची चिमुकली गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत....
Read More
post-image
महाराष्ट्र

विशेष मागासवर्गाच्या आरक्षणाची अंमलबजावणी १५ दिवसात करणार

मुंबई – विशेष मागास प्रवर्गाला महाराष्ट्र शासनाने १९९४ साली २ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र आजवर शिक्षण व नोकरीत या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More