उमरी तालुक्यातील साधूंच्या हत्येप्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

उमरी तालुक्यातील साधूंच्या हत्येप्रकरणी आरोपीला तेलंगणातून अटक

नांदेड – जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील नागठाण या मठात श्री ष. ब्र १०८ सद्गुरू निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य बाल तपस्वी गुरूमाऊली नागठाणकर यांची मध्यरात्री एका माथेफिरूने गळा दाबून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या दोन्ही हत्या गावातीलच एका माथेफिरूने केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या माथेफिरूचे नाव साईनाथ लिंगाडे असे असून पोलिसांनी त्याला तेलंगणा राज्यातून अटक केली आहे.

वाचा – लातूरमध्ये होम क्वारनटाईन होण्यावरून वाद, दोघांची हत्या

पालघरमध्ये दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असताना नांदेडच्या या दुहेरी हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गावातीलच एका माथेफिरूने रात्री २ वाजण्याच्या सुमारास मठात प्रवेश करून महाराजांच्या जवळचा ऐवज लुटला . त्यानंतर त्यांची गळा दाबून हत्या केली. या माथेफिरूने महाराजांचा चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्यांचा मृतदेह त्यांच्याच गाडीत टाकला. त्यानंतर हा माथेफिरू अंगठ्या, सोने इत्यादी ऐवज घेऊन आणि महाराजांच्या मृतदेहास घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. मात्र त्यावेळी गाडीने मठाच्या गेटला टक्कर मारल्याने मोठा आवाज झाला.

त्यामुळे मठातील शिष्यगण जागे झाले. त्यांनी गावातील लोकांना जागे केले. मात्र तेव्हढ्यात माथेफिरून दागिने आणि मृतदेह गाडीतच टाकून तिथून पळ काढला. त्यानंतर शिष्यगण आणि गावकऱ्यांनी महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात नेला. पण आधीच त्यांचा मृत्यू झाला होता.

वाचा – जमिनीच्या वादातून तरुणाची गोळी झाडून हत्या

महाराजांची हत्या करण्यात आली त्याठिकाणच्या मठातील बाथरूममध्ये आणखी एक मृतदेह सापडला. हा मृतदेह उमरी तालुक्यातील चिंचोळे गावातील भगवान शिंदे यांचा असल्याचे उघड झाले. ही हत्यासुद्धा त्याच माथेफिरूने केली असावी असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.दरम्यान, या गावातील माथेफिरूविरुद्ध गावकऱ्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र उमरी पोलिसांनी ती गांभीर्याने घेतली नाही आणि त्याला सोडून दिले.
या आरोपीला मोकाट सोडल्यामुळेच हे हत्याकांड घडल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. या आरोपीला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला होता, तर एका सामाजिक संघटनेने लॉकडाउन तोडून रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. मात्र पोलिसांनी साईनाथ लिंगाडे नावाच्या या माथेफिरू नावाच्या आरोपीला अटक केल्याचे सांगण्यात आल्यानंतर मृतदेह गावकऱ्यांनी ताब्यात घेतला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मनोरंजन

‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट उद्धवस्त केल्या प्रकरणी कारवाईचे आदेश

तिरुवनंतपुरम – ‘मीनल मुरली’ चित्रपटाचा सेट सोमवारी उजव्या विचारसणीच्या कट्टरपंथीयांनी उद्धवस्त केल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, या...
Read More
post-image
देश

विम्याच्या भरपाईचे दावे वाढले; प्रिमिअम वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – कोरोनामुळे गेल्या काही महिन्यांपासून विम्याच्या नुकसान भरपाईचे दावे वाढले आहेत. त्यामुळे संकटात सापडलेल्या विमा कंपन्या आपल्या प्रीमियममध्ये २० ते ४० टक्के...
Read More
post-image
देश

TVS मोटर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात २० टक्के कपातीचा निर्णय

नवी दिल्ली  लॉकडाऊनच्या संकटात आता भारतातील अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्यास सुरुवात केलेली आहे. अशा परिस्थितीत टीव्हीएस मोटर कंपनीनेही आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात...
Read More
post-image
विदेश

अमेझॉनच्या जंगलातही पोहोचला कोरोना; ९८० आदिवासींना लागण

ब्रासिलिया – कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. पण आता ज्याठिकाणी लोक कधीही उत्स्फूर्तपणे जात नाहीत, तिथे जाणे टाळतात. अशा जंगल भागातही कोरोना पोहोचला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात; पाण्यातून काढले ५०० नारळ

कोल्हापूर – कोल्हापूरच्या रंकाळा तलावाच्या स्वच्छतेला सुरूवात झाली आहे. तलावात तांबट कमान परिसरात पडलेल्या पूजाअर्चेच्या साहित्यामुळे प्रदुषणामध्ये भर पडत होती. त्यामुळे येथे मासे, कासव मृत...
Read More