उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी आजपासून रुग्णालयात – eNavakal
देश

उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी आजपासून रुग्णालयात

नवी दिल्ली – उन्नाव बलात्कार प्रकरणाची सुनावणी आजपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयातच घेण्यात येणार आहे. पीडितेची साक्ष नोंदविण्यासाठी रुग्णालयात सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार एम्स ट्रामा सेंटरमध्ये जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.

२०१७ साली उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. पीडितेने भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेला आमदार कुलदीप सेनेगर याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवला होता. त्यानंतर सेनेगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. यात तिच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला तर तिच्यासह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. हा अपघात नसून हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाली. मात्र पीडितेवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू असल्याने तिची साक्ष अद्याप नोंदविण्यात आलेली नाही. तिला न्यायालयात आणल्यास तिची तब्येत खालावू शकते, तिची ओळख सार्वजनिक होऊ शकते. त्यामुळे न्यायालयाने एम्स ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय उभारण्यास परवानगी देऊन ११ सप्टेंबरपासून सुनावणी घेण्यास सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज वर्षावर बैठक

मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात दिवसेंदिवस नव्या रुग्णांची भर पडत आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५४ हजार ७५८ वर पोहोचली आहे. तर...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More