उद्या मेघालय,नागालँड, त्रिपुरा या तीन राज्यांचा निकाल – eNavakal
देश निवडणूक

उद्या मेघालय,नागालँड, त्रिपुरा या तीन राज्यांचा निकाल

नवी दिल्ली – मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या शनिवारी लागणार आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून या मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी तीनही राज्यांमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्रिपुरा येथे 18 फेब्रुवारी रोजी आणि नागालँड, मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला विधानसभेचे मतदान पार पडले होते. त्रिपुरामध्ये गेल्या 25 वर्षांपासून डाव्यांचे सरकार आहे. न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार त्रिपुरात भाजपा आईपीएफटीच्या मदतीने सरकार बनविण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार भाजपा आणि आईएफटीला 35 ते 45 विजय मिळवता येणार आहेत. तर डाव्यांना 14 ते 24 जागांवरच समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे ही निवडणुक अतिशय चुरसीची होणार आहे. तर मेघालयमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. न्यूज एक्सच्या एक्झिट पोलनुसार येथे एनपीपीला 23 ते 27, भाजपाला 8 ते 12 आणि काँग्रेसला 13 ते 17 जागा मिळणार असल्याचे म्हटले आहे. तसेच नागालँडमध्ये नगा पिपल्स फ्रंटचे सरकार आहे. गेल्या 15 वर्षापासून एकत्र असलेल्या भाजपाने 15 वर्षाची युती तोडून एनडीपीपीसोबत घरोबा केला आहे. त्यामुळे भाजपाला येथे सरकार बनवण्याची संधी आहे. भाजपा आणि एनडीपीपीला 27 ते 32 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 2 जागा, एनपीएफला 20 ते 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. अरूणाचल आणि मणीपूरमध्ये भाजपाने नुकतीच सत्ता स्थापन केली आहे. दोन राज्यांमधील सत्ता स्थापनेनंतर त्रिपूरात, नागालँडमध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्याला पंधराव्या वित्त आयोगातील १ हजार ४५६ कोटी रुपये प्राप्त

मुंबई – राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातील 1 हजार 456 कोटी 75 लाख रुपयांचा बंधीत निधी काल प्राप्त झाला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती – कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड...
Read More
post-image
देश

चीनचा डोळा आता हिंद महासागरावर,पाकिस्तानच्या बंदरात खलबतं सुरू

मुंबई -चीन भारतविरोधी सतत कारवाया करत असून आता चीनचा हिंद महासागरावरही डोळा आहे. दक्षिण चीन समुद्रात चीनची नाकाबंदी सुरु झाल्यामुळे चीननं ही नवी चाल...
Read More
post-image
Uncategoriz देश शिक्षण

स्कूल फ्रॉम होममुळे ७२.८% विद्यार्थ्यांच्या दैनंदिन प्रक्रियेवर परिणाम, सर्वेक्षण

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात स्कूल फ्रॉम होम सुरू झाले आहे. मात्र या नव्या पद्धतीचं शिक्षण घेताना विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना कसरत करावी लागत...
Read More
post-image
देश

‘या’ आयटी कंपनीत ५०० कर्मचारी कपात, भारतीय परदेशातून परतणार

नवी दिल्ली -भारतातील अनेक तंत्रकुशल नागरिक इंग्लड, अमेरिकेसारख्या देशात नोकरीसाठी वात्सव्यास आहेत. मात्र कोरोनाच्या काळात त्यांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे. कारण, का आघाडीच्या आयटी...
Read More