उद्या पंतप्रधान मोदींचे उपोषण! केजरीवाल स्टाईल – eNavakal
News आंदोलन राजकीय

उद्या पंतप्रधान मोदींचे उपोषण! केजरीवाल स्टाईल

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेेंद्र मोदी 300 खासदारांचे प्रचंड बहुमत घेऊन सत्तेवर आले. मात्र चारच वर्षांत त्यांना अत्यंत अल्प संख्या असलेल्या विरोधकांनी जेरीस आणले. या विरोधकांना कोणत्यातरी कारणाने बदनाम करण्याचा विचार करून पंतप्रधानांनी स्वत:च उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. उद्या ते पंतप्रधान कार्यालयात बसून उपोषण करतील. त्यांचा उजवा हात असलेले भाजपा अध्यक्ष अमित शहा हे कर्नाटकात (हुबळी) येथे उपोषण आणि आंदोलन करतील तर भाजपा खासदार त्यांच्या मतदारसंघात उपोषणाला बसणार आहेत.

पंतप्रधान मोदींचे हे उपोषण ‘केजरीवाल स्टाईल’ उपोषण आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सत्तेत असताना 2013 साली केंद्रातील सरकारविरोधात रस्त्यावर बसून उपोषण केले होते. त्यावेळी भाजपाने त्यांच्यावर प्रचंड टीका केली होती. भाजपाने म्हटले होते की, सत्तेत असून प्रशासन नीट चालविण्याऐवजी केजरीवाल उपोषणाला बसत आहेत. त्यांची आंदोलनाची सवय जात नाही. आता मात्र केंद्रातील सत्ता असूनही मोदी उपोषण करणार आहेत. मात्र आपले ते बाळ आणि दुसर्‍याचे ते कार्टे या न्यायाने पंतप्रधानांचे उपोषण योग्य ठरविण्याचा भाजपाचा आटापिटा सुरू आहे.
संसद अधिवेशनात विरोधकांनी गदारोळ घालून अधिवेशन चालू दिले नाही. केवळ 28 दिवस कामकाज झाले. विरोधकांनी अधिवेशन बंद पाडून वेळ वाया घालवला म्हणून मी उपोषण करून आत्मक्लेश करणार आहे, अशी पंतप्रधानांची भूमिका आहे. परंतु सत्ताधारी पक्षाची संसद सुरळीत चालू ठेवण्याची जबाबदारी असते. ही जबाबदारी पार पाडण्यात भाजपाला अपयश आले. यासाठी भाजपाने आत्मचिंतन केले पाहिजे.

दुसरी बाब म्हणजे जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेत होता आणि भाजपा विरोधात होता तेव्हा भाजपाने अशाच तर्‍हेने गदारोळ करीत संसद अधिवेशन बंद पाडले होते. त्यावेळी केवळ 33 तास कामकाज झाले होते. त्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली तेव्हा अरुण जेटली म्हणाले की, सरकार ऐकत नसेल तर संसदेत जोरदार बाजू मांडणे हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही बजावणारच. आज स्वतःच्याच या भूमिकेच्या विरोधात भाजपा बोलू लागला आहे. उद्याच्या उपोषणावेळी काय घडते याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More