उद्या आळेफाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन – eNavakal
आंदोलन महाराष्ट्र

उद्या आळेफाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे हल्लाबोल आंदोलन

नारायणगाव-  राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांचा फटका शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना बसत असून सरकारच्या या धोरणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उद्या मंगळवारी  दुपारी २ वाजता हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांनी दिली.

शासनाने अच्छे दिन चे स्वप्न दाखवून नागरिकांची दिशाभूल केली आहे. शेतीमालाला बाजारभाव मिळत नसल्यामूळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या बेरोजगारी अशा सर्वच प्रश्नांवर सरकार अपयशी ठरत आहे शासनाची शेतीविषयक असलेली धोरणे चुकीची आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उद्या मंगळवारी  दुपारी २ वाजता आळेफाटा येथील बाजार समितीच्या आवारात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधानपरीषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, प्रदेश अध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी वळसे पाटील, माजी मंत्री जयंत पाटील माजी आदीवासी विकास मंत्री मधुकररावजी पिचड, राष्ट्रीय प्रवक्ते नबाब मलीक, युवक प्रदेश अध्यक्ष संग्रामजी कोते, खासदार सुप्रिया सुळे, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More
post-image
देश

पश्चिम बंगालचे डॉक्टर ममता बॅनर्जींसोबत सशर्त चर्चेस तयार

कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मागणीनंतर संपावर असलेले शिकाऊ डॉक्टर चर्चेसाठी तयार झाले आहेत. मात्र ‘आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायला तयार आहोत...
Read More