उद्यापासून राज्याभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – eNavakal
महाराष्ट्र

उद्यापासून राज्याभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती  मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या पंधरवड्याचे उद्घाटन उद्या दि. १४ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या त्रिमुर्ती प्रांगणात येथे सकाळी ११ वाजता मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात येईल.

निलांबरी बसमध्ये फिरते प्रदर्शन

भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे. बेस्टच्या ‘निलांबरी’ बसमध्ये हे फिरते प्रदर्शन असणार आहे. मंत्रालय आवारातून निघणारी ही बस पुढील दोन दिवस फोर्ट, नरिमन पाईंट या भागात असेल. या प्रदर्शनातून साहित्य रसिकांना सवलतीच्या दरात पुस्तके विकत घेता येतील.

अभिवाचन स्पर्धा

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने अभिवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात दुपारी १ ते ३ या वेळेत ही स्पर्धा होणार आहे.

ग्रंथालयात दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन

दुपारी १२ वाजता राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, टाऊन हॉल येथे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम https://www.youtube.com/DOLMaharashtra या लिंकवर पाहता येणार आहे. या कार्यक्रमात प्रतिथयश लेखकांच्या दर्जेदार पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. त्याचबरोबर मराठी भाषेतील पीडीएफ व डिजिटाईज स्वरुपातील ग्रंथ संचालनालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

समारोप साहित्ययात्री प्रश्नमंजुषेने

दि. १४ जानेवारीपासून सुरु होणारा हा पंधरवडा भरगच्च कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. राज्य शासनासोबतच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थांमधून मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

या पंधरवड्याच्या समारोपाच्या निमित्ताने दि. २८ जानेवारी २०२१ रोजी ‘साहित्ययात्री’ या प्रश्न मंजुषेचे आयोजन केले जाणार आहे. मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात हा कार्यक्रम दुपारी १ ते ३ या वेळेत होईल. अभिवाचन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात येईल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

उद्यापासून राज्याभरात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुंबई – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १४ ते...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘प्यार किया तो डरना क्या?’, अब्दुल सत्तार धनंजय मुंडेच्या बाजुने

जालना – राज्याचे सामाजिक न्यामंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. त्यातच, शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ‘प्यार किया तो डरना...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबईतील सुरु असलेल्या व प्रस्तावित प्रकल्पांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

मुंबई – पर्यावरण तथा वातावरणीय बदल, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या वांद्रे कुर्ला संकूल...
Read More
post-image
देश

विशेष विवाह कायद्यात ३० दिवसांच्या पूर्व नोटीसीची गरज नाही, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

अलाहाबाद  – विशेष विवाह कायद्यामध्ये अलाहाबाद हायकोर्टाने सर्वात मोठी सुधारणा केली आहे. कोर्टाने यासंदर्भात आदेश देताना विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न करणाऱ्या दाम्पत्याला ३० दिवसांच्या पूर्व...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हानिहाय लस वितरण – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून लस पुरवठा करण्यात आला असून त्यांच्या निर्देशनुसार सर्व जिल्ह्यांना लस वाटप केले जात आहे. दरम्यान केंद्र शासनाने...
Read More