उद्यापासून आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ – eNavakal
क्रीडा देश

उद्यापासून आशिया चषक स्पर्धेला प्रारंभ

युएई – उद्यापासून 14 व्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला प्रांरभ होत आहे. 28 सप्टेंबरपर्यंत रंगणार्‍या या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग या सहा संघांचा समावेश आहे. या संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून, गटातील अव्वल दोन क्रमांक मिळविणारे संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील.

सुपर फोरमध्ये प्रथम दोन क्रमांक मिळविणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. उद्या सलामीची लढत बांगलादेश-श्रीलंका यांच्यात होणार आहे. तर भारताचा पहिला सामना 18 सप्टेंबर रोजी हाँगकाँगशी होईल. तर दुसरा सामना लगेचच 19 सप्टेंबरला पारंपारिक स्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
सुपर फोरमध्येदेखील या दोन संघात आणखी एक लढत होईल. तसेच हे दोन्ही संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले तर तिसर्‍यांदादेखील त्यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे. भारतानेच सर्वात जास्त म्हणजे सहावेळा ही स्पर्धा जिंकली आहे. तर त्या खालोखाल पाचवेळा या स्पर्धेत बाजी मारली आहे. पाकिस्तानला दोनवेळा जेतेपद मिळविता आले. भारताने 90-91 आणि 95 मध्ये सलग तीनवेळा ही स्पर्धा जिंकून शानदार हॅटट्रीक पूर्ण केली. भारतीय संघ या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली खेळणार आहे. वन-डे सामन्यांचा मोठा अनुभव रोहितकडे असून त्याने 6 हजारापेक्षा जास्त
वन-डे केल्या आहेत. दुसर्‍यांदा रोहितकडे भारताची जबाबदारी देण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौर्‍यातील अपयश पुसून टाकण्याची संधी भारतीय संघाला मिळणार आहे. त्याचा कितपत फायदा भारतीय संघ घेतो हे बघणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय गोलंदाजी चांगली असून, फलंदाजांना मात्र आपली कामगिरी चोख पार पाडावी लागणार आहे. मनीष पांडे, केदार जाधव, अंबाती रायडू यांचे कमबॅक या स्पर्धेद्वारे पुन्हा एकदा भारतीय संघात झाले आहे. उपकर्णधार धवनलादेखील इंग्लिश दौर्‍यातील आपले अपयश पुसावे लागणार आहे. भारत-पाकिस्तान-श्रीलंका या तीन संघात जेतेपदासाठी चुरस आहे. अफगाणिस्तानचा युवा फिरकी गोलंदाज राशिद खान या स्पर्धेत कितपत प्रभावी कामगिरी करतो. याकडेदेखील सर्वांचेच लक्ष असेल.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More