उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार! लालकृष्ण अडवाणींनाही भेटणार – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

उद्धव ठाकरे पुन्हा अयोध्येला जाणार! लालकृष्ण अडवाणींनाही भेटणार

मुंबई – अयोध्येतील रामजन्मभुमीच्या वादावर आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वागत केले. आपण येत्या दोन-तीन दिवसांत शिवनेरीवर तर सर्व काही सुरळीत झाले तर येत्या 24 तारखेला पुन्हा अयोध्येत जाणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच राम मंदिर होण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचीही लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशात मी हिंदू आहे हे बोलायला घाबरत होते तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे आज देशातीलच नव्हे तर संपुर्ण जगातील शिवसैनिकांना बाळासाहेबांची आठवण येणे स्वाभाविक आहे. गेल्या 24 नोव्हेेंबरला मी अयोध्येत गेलो होतो. तिथे जाताना मी शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलेलो. ही चमत्कार घडवणारी माती नेल्यानंतर मला विश्‍वास होता की ही माती चमत्कार घडवेल. आणि वर्षभराच्या आत निकाल आला.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्यपालांनी वेळ वाढवून न दिल्याने शिवसेनेची न्यायालयात धाव

मुंबई – राज्यावर राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली सुरू असतानाच शिवसेनेने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शिवसेनेने सत्तास्थापनेच्या दाव्यासाठी राज्यपालांकडे वेळ वाढवून मागितला होता. मात्र राज्यपालांनी त्यास...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊतांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना पदभार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून त्यांच्याकडे  असलेल्या अवजड उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त...
Read More