उद्धव ठाकरे पंढरपूरला जाणार नाहीत – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उद्धव ठाकरे पंढरपूरला जाणार नाहीत

मुंबई – शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याची रक्कम मिळावी, यासाठी शिवसेनेकडून बुधवारी १७ जुलै रोजी वांद्रे-कुर्ला संकुलातील पीकविमा कंपन्यांच्या कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. शिवसेना भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसेच उद्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी ते पंढरपूरला जाणार नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच शिवसेनेच्यावतीने काढला जाणारा मोर्चा हा पीकविमा कंपन्यांसाठी इशारा मोर्चा असेल. शिवसेनेचा मोर्चा हा शेतकरी मोर्चा नसून, तो शेतकऱ्यांसाठीचा मोर्चा असणार आहे. हे आंदोलन नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शेतकरी पोरका नाही, शेतकऱ्यांना नडणाऱ्यांना धडा शिकवला जाईल, असेही ते यावेळी म्हणाले.

दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून दरवर्षी आषाढी एकादशीला मुख्यमंत्री सपत्नीक विठ्ठलाची पूजा करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत प्रथमच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही विठ्ठलाची पूजा करताना दिसणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र उद्धव ठाकरे उद्या पंढरपूरला जाणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More