उद्धव ठाकरेंची १८ एप्रिलला देवरुखमध्ये जाहीर सभा – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंची १८ एप्रिलला देवरुखमध्ये जाहीर सभा

रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची १८ एप्रिल रोजी देवरूखमध्ये जाहीर सभा होणार आहे. दुपारी ११ वाजता ही सभा होणार असून सध्या या सभेची जोरदार तयारी शिवसेनेकडून सुरू आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात १२ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात असले तरी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार माजी खासदार डॉ. निलेश राणे यांच्या मुख्य लढतीकडे सर्वांचे विशेष लक्ष लागले आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत निलेश राणे यांचा शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी पराभव केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा नारायण राणे यांनी निलेश राणे यांना निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. पण तसं पाहिलं तर कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला होता. शिवसेना आणि नारायण राणे यांचं हाडवैर उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेला लक्ष्य करण्याची एकही संधी राणे सोडत नाहीत. आपल्या प्रचारसभांमधूनही राणे उद्धव ठाकरेंसह शिवसेनेच्या नेत्यांवर जोरदार प्रहार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता देवरूखच्या सभेत नारायण राणेंवर कशा पद्धतीने शाब्दिक प्रहार करतात याचीच उत्कंठा अनेकांना आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश विदेश

चेन्नईत भीषण पाणीटंचाई! लिओनार्डोने व्यक्त केली चिंता

न्यूयॉर्क – देशात यंदा मान्सूनच्या आगमनास उशीर झाल्याने भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तामिळनाडूमध्ये ही समस्या अतिशय गंभीर झाली आहे. तेथील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी तडफडावे...
Read More
post-image
मनोरंजन

अभिनेत्री स्मिता तांबेचं ग्लॅमरस फोटोशूट पाहिलंत?

मुंबई – चतुरस्त्र अभिनेत्री स्मिता तांबे हिने नुकतंच स्टनिंग फोटोशूट केलं आहे. करारी, कणखर ते सोज्वळ, सोशीक अशा वेवेगळ्या धाटणीच्या स्त्री-प्रधान भूमिकांमध्ये दिसणारी सशक्त...
Read More
post-image
देश

डीएचएफएलने कर्जाचा हफ्ता बुडविला

नवी दिल्ली – दिवान हाऊसिंग लिमिटेड (DHFL)चे शेअर आज तब्बल नऊ टक्क्यांनी घसरले. बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 68.70 रुपये इतकी झाली आहे. या कंपनीने कमर्शिअल पेपर मॅच्युरिटीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

५१ खासदारांच्या आग्रहानंतरही राहुल गांधी निर्णयावर ठाम

नवी दिल्ली – युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेसच्या लोकसभा खासदारांची बैठक झाली. या बैठकीत कॉंग्रेस नेते राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : ‘टिकेल तोच टिकेल’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज ‘टिकेल तोच टिकेल’ हे कार्य रंगणार आहे. हे कार्य दोन टीममध्ये पार पडेल. कार्यानुसार गार्डन एरियामध्ये एक सिंहासन...
Read More