उद्धव ठाकरेंचा टीडीपी खासदारांना भेटण्यास नकार – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचा टीडीपी खासदारांना भेटण्यास नकार

मुंबई – आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्या, या प्रमुख मागणीला पाठिंबा देण्यासाठी आज चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाचे खासदार शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेणार होते, मात्र टीडीपीच्या खासदारांनी मागितलेली वेळ उध्दवजींनी नाकारली. दरम्यान, सकाळपासून सर्व माध्यमांत या भेटीची चर्चा होती. त्यानंतर उध्दव ठाकरे यांनी टीडीपी खासदारांना भेटीची वेळ दिली नसल्याचा खुलासा त्यांच्या प्रेसकडून करण्यात आला.

आंध्र प्रदेश राज्याला विशेष राज्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी एनडीएत असताना टीडीपीने केली होती. ही मागणी पूर्ण होत नसल्यामुळे चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आज या मागणीला पाठिंबा देण्यासाठी टीडीपीचे खासदार ‘मातोश्री’ येथे जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची भेट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते, मात्र टीडीपी खासदारांना उध्दव ठाकरे यांनी भेटीची कोणतीच वेळ दिली नसल्याचा खुलासा करण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश मुंबई

पेट्रोल-डिझेल आजही महागले; पाहा आजचे दर

मुंबई – सौदी अरबमध्ये झालेल्या हल्यांनंतर जगभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर आजही वाढले आहेत. राजधानी दिल्ली पेट्रोलचे दर प्रतिलिटर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

चिदंबरम यांच्या भेटीला सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग तिहारमध्ये

नवी दिल्ली – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज तिहार रुग्णालयात जाऊन ‘आयएनएक्स मीडिया’ प्रकरणी अटकेत असलेले माजी केंद्रीय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

शेअर बाजारात मोठी उसळी, सेन्सेक्स १३०० अंकांनी वधारला

मुंबई – मोदी सरकारकडून शुक्रवारी कंपनी करात करण्यात आलेल्या कपातीनंतर आज शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. आज शेअर बाजार उघडताच सेन्सेक्सने जवळपास...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

अनुष्का शर्माचा देशातील सामर्थ्यवान व्यक्तींच्या यादीत समावेश

नवी दिल्ली – मिसेस कोहली अर्थात बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला भारतातील सामर्थ्यशाली स्री म्हणून घोषित करण्यात आले आहे. फॉर्च्यून इंडियाने भारतातील ५० सामर्थ्यवान...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – द्रूतगतीवरची कासवगती

केंद्रीय वाणिज्य आणि रेल्वे मंत्री यांना मुंबईतल्या वाहतूक कोंडीचा फटका बसला आणि त्यांनी मुंबईकर कसे संयमी आहेत, असा पलटवार करून वेळ मारून नेली. परंतु...
Read More