‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता दरवर्षी येथे दसरा मेळावा साजरा होतो. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा होणार की नाही याबाबत ठोस निर्णय झालेला नाही. यंदा उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात मेळावा घेण्याऐवजी ऑनलाईन संवाद साधतील अशी चर्चा सुरू आहे. पण आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरेंचं भाषण व्यासपीठावरुनच होणार असल्याचं त्यांनी टीव्ही ९ शी बोलताना म्हटलं आहे.

ऐतिहासिक दसरा मेळाव्याचे भविष्यही अधांतरीच असल्याचं शिवसेनेने सामना संपादकीयमधून म्हटलं होतं. मात्र, खासदार संजय राऊत यांच्या या विधानामु‌ळे साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. “उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असले तरी ते पक्षप्रमुख आहेत. त्यामुळे त्यांचं भाषण हे व्यासपीठावरूनच होईल,” असं सांगताना संजय राऊत यांनी याबद्दल सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली आहे. “शिवसेनेचा दसरा मेळावा ऑनलाइन होईल असं कोणी सांगितलं?,” अशी विचारणाही त्यांनी केली आहे.

“पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील १२ सभा कशा होणार आहेत याचा अभ्यास करु,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. “दसरा मेळावा शिवसेनेची परंपरा असून त्याचं सांस्कृतिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्व आहे. तसंच बऱ्याच वर्षानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला आहे. सरकारने आखलेल्या नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्या चर्चा सुरु असून एक दोन दिवसात निर्णय होईल,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याचं भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More
post-image
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल...
Read More