उद्धवजींनी काल सर्व सांगितले! संजय राऊतांचे वक्‍तव्य – eNavakal
News आघाडीच्या बातम्या मुंबई

उद्धवजींनी काल सर्व सांगितले! संजय राऊतांचे वक्‍तव्य

मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळीही ट्विट केले. वसीम बरेलवी यांच्या दोन ओळी ट्विट करीत ते म्हणाले की, वो झूठ बोल रहा था, बडे सलिके से… मैं ऐतबार न करता तो और
क्या करता…
त्याचबरोबर शिवसेनेच्या मुखपत्रातून मुख्यमंत्री फडणवीस व भाजपावर टीका करण्यात आली. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना शहा आणि फडणवीस यांच्या आशीर्वादाची गरज नाही, भाजपाची पुन्हा पलटी, देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा, हुश्श! ते पुन्हा येणार नाहीत असे मथळे आज मुखपत्रात झळकले.
या ट्विटनंतर आजही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, बाबरी मशिद पडली तेव्हा शिवसैनिक तिथे होते. त्यानंतर मोठे मोठे नेते म्हणाले की बाबरी मशिद प्रकरणाशी आमचा संबंध नाही. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हा एकच वाघ होता ज्याने सांगितले की, होय, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली. उद्धवजींनी हीच भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही सतत मागणी केली की, अध्यादेश काढून राममंदिराची उभारणी सुरू करावी. पण पंतप्रधानांनी ही मागणी मान्य केली नाही ते म्हणाले की, न्यायालयाचाच निर्णय मान्य करावा पंतप्रधानांचे म्हणणे आम्ही मान्य केले . आजच्या निर्णयाचे श्रेय केंद्र सरकारला आणि कोणत्याही पक्ष वा संघटनेला नाही. हा निर्णय कोर्टाचा आहे. हा निकाल लागल्यावर आम्ही सर्व उध्दवजींच्या नेतृत्त्वाखाली अयोध्येला जाणार आहोत.
काल उध्दवजींनी चाबूक शब्दात आपली भूमिका मांडली. त्यांचा संताप, त्यांची चीड खोटेपणाच्या विरोधात त्यांनी व्यक्त केली. त्यांचे वक्‍तव्य ऐतिहासिक होते. महाराष्ट्रात जे फसवणुकीचे राजकारण सुरू होते, उद्धवजींना खोटे ठरविण्याचे षडयंत्र केले होते ते उद्धवजींनी उघड केले. आम्ही काल विषय संपविला. आता यापुढे सत्ता स्थापनेवर बोलणार नाही.

 

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते शरद पवारांना सायंकाळी ५ वाजता भेटणार

मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी आज रात्री ८.३० वाजेपर्यंत वेळ दिली आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादीकडून सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे....
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

साडे आठ वाजण्यापूर्वीच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शिफारस

मुंबई – तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आज सायंकाळी साडे आठ वाजेपर्यंतची वेळ दिली आहे. ही वेळ संपण्यापूर्वीच राज्यपाल...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आशिष शेलार म्हणतात, ‘संजय राऊत यांनी कमी बोलावे’

मुंबई – एकीकडे सत्तास्थापनेच्या वेगवान घडामोडी घडत असताना लीलावती रुग्णालयात दाखल असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या भेटीला शिवसेना आणि राष्ट्रवादीसह भाजपा नेतेही दाखल...
Read More
post-image
देश महाराष्ट्र राजकीय

अरविंद सावंत यांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश जावडेकरांना अतिरिक्त भार

नवी दिल्ली – शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा राजीनामा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजूर केला असून अरविंद सावंत यांच्याकडे असलेल्या अवजड उद्योग...
Read More