उद्धवजींना प्रचाराचीच चिंता; मुंबईकरांचा मात्र विसर – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उद्धवजींना प्रचाराचीच चिंता; मुंबईकरांचा मात्र विसर

अमरावती – भाजपा आणि शिवसेना युतीच्या प्रचारसभेस आजपासून सुरुवात झाली आहे. आज अमरावतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाचे नारे देत भाषणास सुरुवात केली. ही सत्तेसाठी केलेली युती नसून विचारांची युती असल्याचे सांगत केंद्रात आणि राज्यात युतीचं अभूतपूर्व काम असून युती फेविकॉलचा मजबूत जोड आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी गेले १५ दिवस झाले काय बोलायचं काळत नाही असे म्हणत भाषणास सुरुवात केली. हिंदू म्हणून जन्मलो हिंदू म्हणूनच मरणार असे म्हणताना त्यांनी एकदाही काल मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेचा उल्लेख केला नाही. त्यामुळे त्यांना प्रचाराचीच चिंता असून मुंबईकरांचा विसर पडला आहे का, त्यांनी मुंबईकरांना वाऱ्यावर सोडले आहे का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More