उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ – eNavakal
Uncategoriz

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ

जळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना आज सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात तांत्रिक अडचणींमुळे ऑनलाइन होणाऱ्या परीक्षेत गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना पोर्टलवर लॉगइन करता आले नाही.
१२ ते ३१ ऑक्टोबर कालावधीत या परीक्षा होत आहेत. ऑनलाइन परीक्षेचा ३९ हजार ९० विद्यार्थ्यांनी पर्याय निवडला आहे. सोमवारी सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन परीक्षेला सुरुवात झाली. मात्र, अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पोर्टलवर लॉगइन करता आले नाही. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात पडले. ही बाब विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येताच ऑनलाइन परीक्षेसाठी महाविद्यालयनिहाय नेमलेल्या आयटी सहायकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर काही वेळाने लॉगइनमध्ये येणारी अडचण दूर झाली.
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी सुनील पाटील म्हणाले की, सकाळ सत्रात निश्चितच काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षेच्या पोर्टलवर लॉगइन करण्यात अडचणी आल्या. त्यात बहुतांश विद्यार्थी हे मॉक टेस्ट न देणारे होते. त्यांना पोर्टलवर लॉगइन करण्यासाठी काय माहिती भरायची? याची कल्पना नसल्याने ही अडचण आली. परंतु, तत्काळ आयटी सहायकांची मदत घेण्यात आली. त्यानंतर लॉगइनमध्ये येणारी अडचण दूर झाली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
Uncategoriz

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत गोंधळ

जळगाव-उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवी, पदविका व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्ष व अंतिम सत्राच्या (बॅकलॉकसह) परीक्षांना आज सोमवारपासून सुरुवात झाली. मात्र पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात...
Read More
post-image
News Uncategoriz महाराष्ट्र राजकीय

बांबवडे गावामध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्याची कारवाई सुरू ! शिवप्रेमींची निदर्शने !

कोल्हापूर – कोल्हापुरातील बांबवडे गावामध्ये मध्यरात्री अज्ञात शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा चौकात बसविला. परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने तो हटविण्याची कारवाई...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ गुरुवारी मुंबईत धडकणार-हवामान विभागाचा अंदाज

मुंबई- बंगालच्या उपसागरात तयार झालेले चक्रीवादळ पुढील तीन दिवसांत म्हणजेच येत्या गुरुवारी, 15 ऑक्टोबरला मुंबईत धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हे...
Read More
post-image
News महाराष्ट्र

माहुरला रेणुका मातेचा नवरात्रौत्सव रद्द भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन

नांदेड – महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ माहूर गडावरील श्री रेणुका मातेचा यंदाचा नवरात्रौत्सव कोरोनामूळे रद्द करण्यात आला आहे. यावेळी शासनाच्या निर्देशानुसार केवळ अत्यंत...
Read More
post-image
News देश राजकीय

काँग्रेसला रामराम ठोकत अभिनेत्री खुशबू सुंदरांचा भाजपात प्रवेश

नवी दिल्ली – तामिळनाडूमधील तामिळ अभिनेत्री आणि नेत्या खुशबू सुंदर यांनी आज सोमवारी  काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. खुशबू या काँग्रेसच्या राष्ट्रीय...
Read More