उत्तर प्रदेश ते गुजरात! 8 राज्यांत एटीएम ठप्प, एटीएममध्ये पैसेच नाहीत! दोन हजारांच्या नोटाही गायब – eNavakal
News अर्थ देश

उत्तर प्रदेश ते गुजरात! 8 राज्यांत एटीएम ठप्प, एटीएममध्ये पैसेच नाहीत! दोन हजारांच्या नोटाही गायब

पाटणा – विवाह सोहळे आणि शाळा, कॉलेजना सुट्टीच्या ऐन काळात गेल्या दहा दिवसांपासून आठ राज्यांतील एटीएम मशीनमधून पैसेच मिळेनासे झाले आहेत. एटीएम बंद, एटीएम बिघडले, एटीएममधील रक्कम संपली असे बोर्ड सर्वत्र दिसू लागल्याने या आठ राज्यातील नागरिक हैराण झाले आहेत. नोटबंदीच्या नंतर या नोट टंचाईच्या प्रकाराने सर्वच हवालदिल आहेत.

उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, दिल्ली आणि तेलंगणा या चार राज्यांतील संपूर्ण एटीएम व्यवस्थाच कोलमडली आहे. स्टेट बँक, अ‍ॅक्सीस, आयसीआय अशा सर्वच बँकांतील एटीएममधून गेले दहा दिवस पैसेच मिळेनासे झाले आहेत. त्यात दोन हजारांच्या नोटाही गायब आहेत. म्हणजे कॅशलेस म्हणून नोटा घरी ठेवायच्या नाहीत आणि ऐनवेळी गरज लागली तर एटीएममधून मिळत नाहीत अशा वेळी खर्च भागवायचा कसा असा प्रश्न पडला आहे. विवाह सोहळ्यांसाठी रोकड लागते. मुलांना सुट्ट्या असल्याने रोकड हवी असते. पर्यटन करताना रोख रक्कम आवश्यक असते. अशा वेळी हा गोंधळ सुरू झाला आहे.
एटीएममधून पैसे निघत नाहीत ही वस्तुस्थिती असूनही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी काँग्रेसलाच दोष देत म्हटले की, काँग्रेस यात खोटा प्रचार करीत आहे. अखेर नागरिकांचा संताप लक्षात घेऊन अर्थमंत्री अरुण जेटलींनी खुलासा केला की, बाजारात आवश्यक तेवढी चलन व्यवस्था आहे. मात्र काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला हे या समितीचे सदस्य आहेत. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँकेकडे सध्या 1 लाख 25 हजार कोटींची रोकड आहे. मात्र काही भागात मागणी अतिरिक्त वाढल्याने तिथे तुटवडा निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात या तुटवड्याची अद्याप फारशी झळ पोहचलेली नाही. मात्र अमरावती आणि चंद्रपूरच्या काही भागांत ही नोट टंचाई जाणवत आहे.

जेटलींचा खुलासा

बाजारात आश्यक तेवढी चलन व्यवस्था आहे. मात्र काही ठिकाणी अचानक मागणी वाढल्याने तुटवडा जाणवत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने एक समिती स्थापन केली आहे.
– अरुण जेटली, अर्थमंत्री

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More