उत्तम लेखांचा ‘पुनश्च’ अनुभव घ्या – eNavakal
लेख

उत्तम लेखांचा ‘पुनश्च’ अनुभव घ्या

31 मार्चला ‘पुनश्च’ सुरू करून बरोबर सहा महिने झाले. गेल्या जूनपासून या उपक्रमाची जुळवाजुळव सुरू होती. खरंतर नियतकालिक सुरू करण्याचा किडा माझ्या डोक्यात कॉलेजात असल्यापासून वळवळत होता. पण करियर, स्पर्धा परीक्षा तयारी यात तो शांत झाला. पण पूर्ण मेला नाही. धुगधुगी होती. पुढे कितीतरी वर्षांनी माधवबाग मध्ये मला ती हौस भागवायला मिळाली. तिथे आम्ही पेशंट्ससाठी ‘आरोग्यसंस्कार’ मासिक काढायचो. प्रामुख्याने आरोग्यविषयक लेख त्यात असायचे. पेशंट्स साठी पुस्तकेही प्रकाशित केली. हे सगळं 9 वर्ष सुरू होतं. त्यामुळे असं म्हणता येईल की प्रकाशन व्यवसायातील उमेदवारी माझी तिथे झाली.

मग अलीकडे मला एखादं वैचारिक मासिक काढावं असं वाटायला लागलं. पण आजूबाजूला आजचा सुधारक, अंतर्नाद अशा उत्तम साहित्य देणार्‍या मासिकांना घरघर लागलेली दिसत होती. बदलत चाललेल्या तंत्रज्ञानामुळे दुरावत चाललेला वाचकवर्ग आणि आहे त्या वाचकापर्यंत पोचायची व्यवस्था म्हणजे बेभरवशाचे पोस्ट आणि महागडे कुरियर. यात चांगल्या चांगल्या ध्येयवादी मासिकांची परवड झाली. इतकी की त्यांना बंद करायचा निर्णय घ्यावा लागला.

डिजिटलकडे कल
हे सर्व समोर दिसत असताना प्रिंट स्वरूपातील मासिक काढण्याची इच्छा होणे अस्वाभाविक होते. त्याला पर्याय दिसत होता नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार. म्हणजे डिजिटल स्वरूपातील मासिक काढणे. मला स्वतःला त्यातील काहीच माहिती नव्हती. पण पर्यायच नव्हता म्हटल्यावर माहिती काढणे आलेच. त्यानुसार जमवाजमव सुरू केली. माधवबाग, मेतकुटमधील यशस्वी करियरनंतर मी पुन्हा हा नवीन खेळ मांडणार होतो. पुनश्च हरिओम करणार होतो. म्हणून या उपक्रमाचे नाव ’पुनश्च’ ठेवण्याचा निर्णय घेतला. ते नंतर अधिक अचूक कसं ठरलं ते नंतर येईलच. मग त्या नावाने वेबसाईट नोंदणी करणे वगैरे सोपस्कार पार पडले. विनय सामंत या माझ्या ओळखीच्या डेव्हलपरकडून साईट आणि अ‍ॅप बनवायचे ठरवले. डिजिटल स्वरूपात यायचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा त्याला मासिक कसं म्हणावं असा प्रश्न आला. मासिक म्हणजे महिन्यातून एकदा प्रसिद्ध होते ते. मग आपण पण महिन्यातून एकदाच एकदम 10-12 लेख साईट आणि अ‍ॅपवर टाकायचे? उत्तर आलं की तसं करण्याची गरज नाही. माध्यम डिजिटल असल्यामुळे आपण दर 2-3 दिवसांनंतर एकेक लेख प्रसिद्ध करू शकतो. वाचकालाही थोडी उसंत मिळते. म्हणून मग हे डिजिटल मासिकाऐवजी डिजिटल नियतकालिक झाले. डिजिटल असल्यामुळे लेखांना शब्दमर्यादा असायची गरज नव्हती. त्यात वाटेल तितके फोटो, चित्र टाकू शकत होतो. ते कलर. लेखाच्या मजकुराला उठाव येण्यासाठी त्यात व्हिडीओ टाकू शकत होतो. अधिक माहितीसाठी लिंक्स देऊ शकत होतो. असे बरेच फरक मला प्रिंट आणि डिजिटल माध्यमात कळायला लागले. मी आधी ’आरोग्यसंस्कार’ च्या अंकाचे पीडीएफ ऑनलाईन टाकायचो आणि आमचा अंक डिजिटल आहे असं म्हणायचो. पण हे सगळं पाहिल्यावर आपण त्यावेळी जे करीत होतो ते किती अपुरं होतं याची जाणीव झाली. डिजिटल माध्यमामुळे किती प्रती छापायच्या हा प्रश्नही निकालात निघाला. तंत्रज्ञानाची समज चांगली असल्यामुळे वाचकाला चांगला वाचनानुभव देण्यासाठी कायकाय करता येईल त्याच्या निरनिराळ्या कल्पना तयार होत्या. लेखावर तिथेच कमेंट देण्याची सोय, लेख ऑफलाईन वाचायची सोय, लेखातील कठीण शब्दार्थ, म्हणी, वाक्प्रचार यांचा अर्थ समजण्याची सोय अशा काय काय सोयी आम्ही अ‍ॅपमध्ये करून घेतल्या. मुळात कॉम्प्युटरवर वाचणार्‍यांची सोय म्हणून वेबसाईट आणि मोबाईल धारकांसाठी अ‍ॅप देणे ही एक मोठीच सोय होती. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा जास्तीतजास्त वापर करून पुनश्च ही वेबसाईट आणि अ‍ॅप बनवले.

साहित्य कोठून येते?
हे सगळे झाले पण या मासिकात साहित्य कुठले द्यायचे ते ठरत नव्हते. एक दिवस मी असाच मोकळा वेळ मिळाला असताना हौशीने विकत घेतलेले दिवाळी अंक आणि वर्गणी भरलेले आणि दर महिन्याला घरी येऊन उघडूनही न पाहिलेले रुची, अंतर्नादचे अंक घेऊन आरामात वाचत बसलो. एकेका अंकात काही काही लेख एवढे सुंदर मिळायचे की वाटायचं ’अरे यार ! बरं झालं आपण हे आज काढले अंक. नाहीतर इतकं चांगलं साहित्य वाचायचंच राहून गेलं असतं…’ वाचतावाचता एका लेखापाशी आलो आणि अगदी वाटलं की आत्ता इथे खाली जर शेअरचे बटन असते ना तर हा लेख मी माझ्या मित्रमंडळींना पाठवून दिला असता. तिथे माझी ट्यूब पेटली. हेच साहित्य आपण पुनश्चमध्ये वापरलं तर? नावही समर्पक आहे. ठरलं. असे लेख या सगळ्या जुन्या अंकातून मिळवायचे जे त्या लेखक/संपादकांनी खूप मेहेनतीने तयार केलेले आहेत. ते युनिकोडमध्ये टाईप करून घ्यायचे. त्या लेखकाला किंवा त्यांच्या वारसाला का्रॅपीराईट पैसे देऊ करायचे आणि रीतसर त्यांच्या परवानगीने ते वाचकांपर्यंत पोचवायचे.

फुकट नको
त्यानुसार काम सुरू केलं आणि 30 सप्टेंबरला दसर्‍याच्या मुहूर्तावर गेल्या वर्षी हा उपक्रम लोकार्पण केला. पहिल्याच दिवशी 55 वाचकांनी पैसे भरून सभासदत्व घेतले आणि माझी एक मुख्य शंका दूर झाली. सगळ्यांना वाटत होतं की मी हे अ‍ॅप आणि वाबसाईट लोकांना फुकट ठेवावी. कारण पैसे देऊन कोणीही आता वाचत नाही असं त्याचं म्हणणं होतं. फेसबुक आणि व्हॉटस्अ‍ॅपवर इतके साहित्य येऊन आदळत असताना, तेही फुकट, हे तुझं विकतच साहित्य कोण वाचणार, असा सगळ्यांचा प्रश्न होता. पण मी ठरवलं होतं की आपण विचार पोचवणार आहोत आणि लेखकाच्या प्रतिभेची काही किंमत असते हा पहिलाच विचार आपण पोचवू शकलो नाही तर काय उपयोग? त्यामुळे कमीतकमी का होईना काहीतरी शुल्क वाचकांकडून घ्यायचे हे ठरले. माझा विचार लोकांना पटल्याची खूण होती ते पहिले 55 सभासद. मग पुनश्चचा लेख पाठवण्याचा आणि वाचकांचा सहभागी होण्याचा सिलसिला सुरू झाला. गेल्या सहा महिन्यात हा विश्वास नक्की आला की पैसे देऊन वाचायची गरज समजणारा प्रगल्भ वाचक आहे फक्त त्याच्यापर्यंत हा उपक्रम पोचला पाहिजे.

एकदिव्य
आता आव्हान असणार आहे ते चांगले लेख शोधण्याचे, ते निवडण्याचे आणि वाचकांना तंत्रज्ञानाभिमुख करण्याचे. सर्व जुनी मासिके ज्यांनी जतन केली आहेत त्यांच्याकडून ती मिळवणे हे कठीण आहे, त्या मासिकांना कमालीच्या नाजूकपणे हाताळावे लागते नाहीतर त्यांची पाने लगेच फाटतात. बरीच मासिके आता बाईंड केलेल्या अवस्थेत मिळतात. त्यामुळे त्याच्या पानांचे फोटो काढणे हेही अवघड होते. वाळवी आणि धूळ हे या जुन्या मासिकांचे शत्रू आहेत. त्यापासून त्यांना वाचवणे हे एक स्वतंत्र कार्य आहे. लेख मिळाल्यावर त्या लेखाच्या लेखकाला (किंवा वारसाला) शोधणे आणि त्याच्या कॉपीराईटचे पैसे देणे हेही एक दिव्य आहे.

डिजिटलचे फायदे-तोटे
पुनश्च डिजिटल माध्यमावर असण्याचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटेही असणार आहेत. आजही लोकांचा लिखित शब्दावर जास्त विश्वास आहे, मुद्रित माध्यम त्यांना जास्त जवळचे वाटते. समोर भौतिक स्वरुपात जे दिसेल ते सत्य बाकी ऑनलाईन वगैरे मिथ्या असं मानणार्‍यांचा मोठा गट आहे. शिवाय डिजिटल माध्यमाच्या चुकीच्या हाताळणीमुळे डिजिटल माध्यम हे फुकट, तथ्यहीन आणि त्यामुळे टाईमपास म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याला कोणीही गांभीर्याने घेताना दिसत नाही. घरी आल्यावर टीपोयवर पडलेले मासिक जितक्या सहजतेने उचलले जाते, हाताळले जाते तेवढे हे माध्यम दृश्य नाही. म्हणजे मोबाईल किंवा कॉम्प्यूटर सुरू केल्याशिवाय याचे अस्तित्व शून्य असते. त्यातही त्या कॉम्प्यूटर आणि मोबाईलवर एवढ्या गोष्टी असतात की त्यामुळे होणारे वळीीींरलींळेप टाळून आपल्या अ‍ॅप किंवा ुशलीळींश वर वाचकाला घेऊन येणे कर्मकठीण असते.

100 रुपयांत वर्षभर
सरकारने कितीही गवगवा केला तरीही आपला भारत तर‘डिजिटल इंडिया’ होण्यापासून कोसो दूर आहे हे मला जाणवले. मोदींनी केलेल्या नोटाबंदीनंतर आता कॅशचे व्यवहार कमी झालेत, लोकं पैसे ऑनलाईन भरू शकत आहेत वगैरे ऐकत होतो. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळा आहे. आजही खूप जणांना पुनश्चचे शुल्क भरायचे आहे. कारण हल्लीच्या जमान्यात 100 रुपये वार्षिक कोणालाही परवडू शकते. पण ते वाचक या ऑनलाईन व्यवहारांपासून अनभिज्ञ आहेत. जे ेपश्रळपश व्यवहार नियमितपणे करतात ते या सगळ्या साहित्यापासून अनभिज्ञ आहेत. जुन्या जमान्यातल्या वाचकांना ऑनलाईन व्यवहार शिकवणे आणि नवीन जमान्यातील वाचकाला मराठी साहित्याकडे आकृष्ट करणे हेही मोठे आव्हान आहे. या सगळ्या आव्हानांना आम्ही कसे सामोरे जातो यावर ‘पुनश्च’ चा पुढील प्रवास अवलंबून असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नागपुरात उच्चशिक्षित डॉक्टरची कुटुंबियांसह आत्महत्या

नागपूर – नागपुरात आज सकाळी सर्वांना धक्का देणारी भीषण दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरमधील डॉक्टर धीरज राणे त्यांची पत्नी सुषमा राणे, त्यांचा अकरा वर्षाचा...
Read More
post-image
न्यायालय महाराष्ट्र

मराठा आरक्षण हे केंद्राच्या आर्थिक आरक्षणासोबत पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे ऐकले जावे

मुंबई – मराठा आरक्षणासंदर्भात येत्या 25 ऑगस्टला आणि नंतर सप्टेंबर महिन्यात रितसर सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते ॲड. विनोद पाटील...
Read More
post-image
कोरोना महाराष्ट्र राजकीय

खा. नवनीत राणा यांना पुन्हा कोरोना! पालिकेने केलेल्या चाचणीत पॉझिटिव्ह

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना नुकताच मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र डिस्चार्ज दिल्यानंतर...
Read More
post-image
देश शिक्षण

पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरील युक्तिवाद आणखी ३ दिवस चालणार

नवी दिल्ली – देशभरातील विद्यापीठांच्या पदवीच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सर्वच राज्यांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

आयपीएलच्या मुख्य प्रायोजकत्वासाठी ‘ड्रीम ११’ कंपनी २२२ कोटी मोजणार

नवी दिल्ली – यंदा यूएईमध्ये होणाऱ्या बहुप्रतीक्षित आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला असून ‘ड्रीम ११’ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. त्यासाठी ‘ड्रीम ११’...
Read More