ईश्वराच्या नाही, चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे घेतली आमदाराने शपथ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

ईश्वराच्या नाही, चक्क मुख्यमंत्र्यांच्या नावे घेतली आमदाराने शपथ

विजयवाडा – भारतातील आमदार संविधानाच्या अनुच्छेद 188 च्या नियमांनुसार ईश्वराच्या साक्षीने किंवा संविधानाच्या साक्षीने शपथ घेतात. आंध्रप्रदेशच्या विधानसभेतील नव्या सदस्यांनी बुधवारी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचित आमदार कोटमरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी मात्र विधानसभेत देवाचे नाव नाही तर चक्क मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींचे नाव घेऊन आमदारकीची शपथ घेतली. यावेळी विधानसभेचे हंगामी सभापती अप्पाला यांनी त्यांना थांबवल्यानंतर त्यांनी देवाचे नाव घेऊन शपथ घेतली. मात्र जगन मोहन रेड्डी माझ्यासाठी देव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, ते दुसऱ्यांदा आमदार झाले असून यावेळी नेल्लोर ग्रामीण विधानसभा क्षेत्रातून निवडून आले आहेत.

‘मी एका गरीब कुटुंबातून आलो आहे. त्यामुळे मला कोणतीही राजकीय किंवा आर्थिक पार्श्वभूमी नाही आहे. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी मला दोनवेळा आमदार केले आहे. त्यांच्या नावाने शपथ घेण्यामागे माझी कोणतीही मंत्रीपदाची अपेक्षा नाही’, असे कोटमरेड्डी श्रीधर रेड्डी यांनी यावेळी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

विक्रम लँडरशी संपर्काची आशा धूसर; चंद्रावर संध्याकाळ

नवी दिल्ली – भारताची महत्त्वाकांशी मोहीम असलेल्या चांद्रयान २ च्या विक्रम लँडरशी संपर्क करण्याची मुदत कमीकमी होत चालली आहे. 6 आणि 7 सप्टेंबरच्या दरम्यान...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

‘आयफा’ने गाजवली रात्र; ‘ही’ अभिनेत्री ठरली सर्वोत्कृष्ट

मुंबई – बॉलिवूड चित्रपटाचा सोहळा ‘आयफा’ सोमवारी मुंबईत पार पडला. यंदाचं आयफा पुररस्कारांचं हे २०वं वर्ष. दरवर्षी परदेशातच पार पडणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याची रंगत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राजनाथ सिंह आज ‘तेजस’मधून उड्डाण करणार

नवी दिल्ली – देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज ‘तेजस’ या भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानातून प्रवास करणार आहेत. तेजसच्या दोन सीट असलेल्या एअरक्राफ्टमधून राजनाथ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

गरज असेल तरच घराबाहेर पडा! आज अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबई उपनगरासह राज्यातील अनेक भागांना काल रात्रभर पावसाने झोडपल्यानंतर आज मुंबई, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्याला मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

मुंबईसह कोकणात रेड अलर्ट, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

मुंबई – भारतीय हवामान विभागाने आज मुंबईसह उपनगर, ठाणे आणि कोकणात आज अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शालेय शिक्षण मंत्री...
Read More