ईशा अंबानीच्या साखरपुड्यात प्रियंका-निकचा देसी अवतार! – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ईशा अंबानीच्या साखरपुड्यात प्रियंका-निकचा देसी अवतार!

नवी दिल्ली – आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची कन्या ईशा अंबानीचे लग्न अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पिरामलसोबत ठरले आहे. या दोघांचा साखरपुडा साध्यासुद्या ठिकाणी नाही तर, इटलीतल्या लेक कोमो पार पडणार आहे. या साखरपुड्यात अनेक बॉलीवुड कलाकार सहभागी झाले आहेत. बॉलीवुडची देसीगर्ल प्रियंका चोप्राने होणाऱ्या नवऱ्यासोबत म्हणजेच निक जोनाससोबत साखरपुड्याला हजेरी लावली. 

अंबानी कुटुंबात पुन्हा शानदार सोहळा होत आहे. मुकेश अंबांनींची कन्या ईशा अंबानी आणि अजय पिरामील यांचा पुत्र आनंद पीरामल या दोघांचा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा भारतात नसून इटलीतील प्रसिद्ध लेक कोमोवर होणार आहे. २१ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर असे ३ दिवस हे सेलिब्रेशन करण्यात येणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये ईशा आणि आनंद लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. रविवारपर्यंत ईशा अंबानी आणि आनंद पिरामलच्या साखरपुड्याचे कार्यक्रम सुरु राहणार आहेत. शुक्रवारपासून सुरु झालेल्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजेरी लावली. डिजाइनर मनीष मल्होत्राने त्यात केलेल्या भारतीय पेहरावात प्रियंका आणि निकने हजेरी लावली. प्रियांकाने सिएना रंगाची साडी तर निकने पेस्टल रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती. स्वत: मनीष मल्होत्राने इन्स्टाग्रामवर दोघांचे फोटो आणि इंस्टा स्टोरी शेअर केली.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय

कल्याण- कल्याण-डोंबिवली पालिकेने वारंवार लागत असलेल्या आगीमुळे आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड कायमचे बंद करण्याचा निर्णय घेतला असून पालिकेकडून आता बारावे गावातील शास्त्रीय पद्धतीने राबवण्यात येणार्‍या...
Read More
post-image
देश

काँग्रेसच्या एसी, एसटी आमदारांच्या संख्येत दुपटीने वाढ

नवी दिल्ली – दलित मतदारांमध्ये नाराजी निर्माण झालेल्या या मोठ्या मतदाराला पुन्हा आकर्षित करण्यास काँग्रेस यशस्वी ठरली आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांत...
Read More
post-image
महाराष्ट्र

सोशल मीडियावर पोलिसांची नजर

पुणे – आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर जोरदार धुमश्चक्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर पोलिसांची नजर राहणार आहे. राजकीय नेत्यांचे फोटो मॉर्फिंग,...
Read More
post-image
देश

‘मोदी हटाओ, योगी लाओ’ लखनऊत पोस्टरबाजी

लखनऊ – तीन राज्यातील विधानसभा निवडणुकीतील भाजपाच्या पराभवानंतर लखनऊमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पंतप्रधान बनवा असे पोस्टर झळकले आहेत. उत्तर प्रदेश नवनिर्माण...
Read More
post-image
देश

वेगळा धर्म म्हणून मान्यता जंतरमंतरवर जोरदार आंदोलन

नवी दिल्ली – लिंगायत समाजाला हिंदू धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता द्या, या मागणीसाठी आज दिल्लीच्या जंतरमंतरवर लिंगायत समाजाने जोरदार आंदोलन केले....
Read More