ईशान्य भारतातील राज्यांच्या निवडणुका रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार : रामदास आठवले – eNavakal
मुंबई राजकीय

ईशान्य भारतातील राज्यांच्या निवडणुका रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार : रामदास आठवले

मुंबई – ईशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तिन्ही राज्यांच्या विधानसभा निवडणुका रिपब्लिकन पक्ष  स्वबळावर लढणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवलेंनी आज केली आहे. या तिन्ही राज्यांच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाची  व्यूहरचना ठरविण्यासाठी ईशान्य भारतातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांची  महत्वपूर्ण  बैठक  13 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी येथे आयोजित करण्यात आली आहे.  या बैठकीस ना रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार असल्याची माहिती रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी निरीक्षक विनोद निकाळजे यांनी दिली आहे.
त्रिपुरा राज्याची विधानसभा  निवडणूक दि 18 फेब्रुवारी रोजी  असून मेघालय आणि नागालँड  राज्याची विधानसभा  निवडणूकिसाठी मतदान दि 27 फेब्रुवारी रोजी आहे. या तिन्ही राज्यांच्या निवडणुका रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढत असून त्याबाबत ची व्यूहरचना ठरविण्यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या उपस्थितीत दि 13 फेब्रुवारी रोजी ईशान्य भारतातील रिपाइंच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि 14 फेब्रुवारी तसेच दि 19 आणि 22 फेब्रुवारी रोजी रिपब्लिकन पक्षाच्या उमेद्वारांच्या प्रचारासाठी रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले हे  त्रिपुरा ;मेघालय आणि नागालँड चा दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ना आठवले यांच्या आगरतळा, शिलॉंग आणि बिमापूर येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या असल्याची माहिती रिपाइंचे ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे यांनी दिली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखरावर मृत्यू

काठमांडू – भारतीय गिर्यारोहक अंजली कुलकर्णीचा एव्हरेस्ट शिखर उतरतांना पाय घसरून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना घडली आहे. त्यांचे पती शरद कुलकर्णी देखील त्यांच्या सोबत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More