ईशान्येकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस; जनजीवन विस्कळीत – eNavakal
देश

ईशान्येकडील राज्यांमध्ये तुफान पाऊस; जनजीवन विस्कळीत

आसाम – मुंबईसह राज्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी इतर राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे देशाच्या ईशान्य भागात तब्बल १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बहुतेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. गेल्या ४८ तासांत पावसाचा जोर अधिक वाढल्याने अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. काझीरंगा नॅशनल पार्कमध्येही पाणी शिरल्याने प्राण्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

असाममध्ये तर पावसाने कहरच केला आहे. ब्रह्मपुत्रा नदीची पातळी वाढल्याने आसाममधील धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, जोरहाट, डांगरे, बारपेटा, गोलाघाट, नलबारी, मझौली, चिरंग आणि दिब्रूगडसह १७ जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला आहे. परिणामी ४ लाख नागरिकांचे विस्थापन करण्यात आले आहे. तसेच शेतीचीही नासधूस झाली आहे. दरम्यान, बिहार राज्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More