इफ्तार पार्टीत प्यायली दारू; विद्यार्थिनीला नोटीस – eNavakal
News देश

इफ्तार पार्टीत प्यायली दारू; विद्यार्थिनीला नोटीस

नवी दिल्ली – इफ्तार पार्टीत दारु प्यायल्यामुळे एका विद्यार्थिनीला अलिगड मुस्लिम विद्यापीठाने कारणे दाखवा नोटीस दिली आहे. ही घटना दहा दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये घडली. परंतु आता या विद्यार्थिनीचा दारू पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ‘हे अत्यंत संवेदनशील प्रकरण असून धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. प्रशासनाकडून विद्यार्थिनीला कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. जर विद्यार्थिनीकडून योग्य ते उत्तर आलं नाही तर शिस्तपालन समिती तिच्याविरोधात योग्य ती कारवाई करेल’, अशी माहिती विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी प्रमुख एम शफे किडवाई यांनी दिली आहे. तर विद्यार्थिनीला कारणे दाखविण्यासाठी १ आठवडाभर वेळ देण्यात आली आहे.

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

उल्हासनगरात राष्ट्रवादी काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर

उल्हासनगर,- उल्हासनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसला जिवंत ठेवणार्‍यांची शहर जिल्हा अध्यक्षपदी वर्णी न लावता भाजपाला मदत करणार्‍या आमदार ज्योती कलानी यांना पुन्हा शहर जिल्हा अध्यक्ष...
Read More
post-image
News मुंबई

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व सातही धरणे 90 टक्के भरली

मुंबई- मुंबईला पाणीपुरवठा करणारी सात धरणे 90 टक्के भरली असून मुंबईसाठी अतिमहत्त्वाचे भातसा धरण 84 टक्के भरले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसांत चांगला...
Read More
post-image
News मुंबई

कुर्बानीचा ऑनलाईन परवाना 20 ऑगस्टपर्यंत देऊ नका-हायकोर्ट

मुंबई- बकरी ईदनिमित्ताने कोणालाही कुर्बानीचा ऑनलाईन परवाना नियमबाह्यपद्धतीने आणि कोणतीही शहानिशा न करताच कोणालाही परवानगी दिली जात असल्याचे आज उच्च न्यायालयात उघडकीस आल्याने न्यायमूर्ती...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

माजी पंतप्रधान वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला सुरुवात

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे आज सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्याच्यावर मागील ६६ दिवस एम्स रुग्णालयात उपचार...
Read More