ईडीकडून चंदा कोचरची ८ तास कसून चौकशी – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे देश

ईडीकडून चंदा कोचरची ८ तास कसून चौकशी

नवी दिल्ली – बँक कर्ज घोटाळा प्रकरणी आयसीआयसीआयच्या बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची सोमवारी आठ तासांहून अधिक काळ अंमलबजावणी संचालनालयाने चौकशी केली. त्याच्याविरोधातील बँक कर्जघोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ते ईडीसमोर उपस्थित झाले होते. सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झालेल्या कोचर दाम्पत्यांनी सुटका रात्री आठच्या सुमारास झाली.

काय आहे नेमकं प्रकरण?

2009 मध्ये चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना नियम डावलून तसेच पदाचा गैरवापर करत वेणूगोपाल धूत यांच्या व्हिडिओकॉन उद्योगसमूहाला 2009 ते 2011 या काळात चंदा कोचर यांनी वेगवेगळी कारणे दाखवत 1575 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. ज्यानंतर धूत यांनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या व्यवसायात 64 कोटी रुपयांचे भांडवल गुंतवले. त्यानंतर कर्ज घेताच व्हिडीओकॉन उद्योग समुहाने 30 जून 2017 साली कंपनीचे दिवाळे निघाल्याचे जाहीर केले. व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज देताना चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका सीबीआयने ठेवत याप्रकरणी चंदा कोचर, वेणूगोपाल धूत यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ऑक्टोबर २०१८मद्ये चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More