इस्त्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचे अतिरिक्त भत्ते बंद – eNavakal
देश

इस्त्रोच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचे अतिरिक्त भत्ते बंद

चेन्नई – एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठविल्याने आणि विक्रम लँडरला चांद्रभुमीवर उतरविण्याचा प्रयत्न केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शास्त्रज्ञाना करकचून मिठ्या मारत आहेत. त्याचेवळी दुसरीकडे केंद्र सरकारने ‘इस्त्रो’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ, हजारो कर्मचारी, तंत्रज्ञ आणि इंजिनिअर्सचे अतिरिक्त भत्ते बंद केले आहेत. त्यांची पगारवाड रोखली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

भत्ते व पगारवाढ रोखल्याने देशभरातील सर्व अंतराळ संशोधन केंद्रातील हजारो कर्मचारी केंद्र सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध करीत आहे. एकीकडे शास्त्रज्ञांच्या अंतरिक्ष कामगिरीचे कौतुक करायचे व दुसरीकडे पगार व भत्त्यांमध्ये कपात करायची या फसवेगिरीमुळे हे शास्त्रज्ञ व कामगार व्यथित आहेत.

भारताच्या अंतरिक्ष विभागाचे उपसचिव एम.रामदास यांनी 12 जूनला एक अधिसूचना काढून देशभरातील अंतराळ शास्त्रज्ञ व हजारो कामगार आणि अभियंत्यांची पगारवाढ व भत्ते 9 जुलैपासून बंद केले. सहावा वेतन आयोग आणि कार्यक्षमतेबद्दल शास्त्रज्ञांना दिला जाणारा भत्ता मिळून शास्त्रज्ञांना 40 टक्के पगारवाढ मिळणार होती. मात्र हा प्रोत्साहन भत्ता व पगारवाढच केंद्र सरकारने बंद केली.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More